नागपूर- एकीकडे नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पुढे गेली आल्याने चिंता वाढत आहे. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील शंभरच्या पुढे गेली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक असल्याने येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०५ इतकी झाली आहे. त्यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत, तर ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या नागपुरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये सुमारे १५०० नागरिक विलगीकृत आहेत. त्यांची चाचणी घेतली जात आहे. विलगीकृत असलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा येथील नागरिकांचा मोठा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्याने शहरात जरी चिंतेचे वातावरण असलेले, तरी हळू हळू कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने नागपुरकरांना थोडा दिलासा आहे.
हेही वाचा- पत्नीच्या चारित्र्यावर संशय, चार वर्षांच्या चिमुकलीसमोर आईची हत्या ; आरोपीला अटक