नागपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भातील मुस्लिम समाजामध्ये विरोधक भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, कायद्याची माहिती मिळत नसल्याने अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले गेले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी मोहन नगरच्या मुस्लिम वस्तीत जाऊन मुस्लिम समाजातील नागरिकांच्या भेटी घेतल्या, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभारी सरोज पांडे या देखील उपस्थित होत्या.
हेही वाचा - एकेकाळी चाळीमध्ये राहणारा माणूस करणार चाळीचा विकास!
"गेल्या अनेक पिढ्या भारतात हक्काने राहणारा प्रत्येक मुस्लिम हा भारताचा नागरिक आहे. भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर विरोधक जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची दिशाभूल करून त्यांच्या भावना भडकवण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएए हा कायदा कोणत्याही भारतीय मुस्लिम समाजाच्या किंवा नागरिकांच्या विरोधात नाही." हे पटवून देण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
मुस्लीम समाजाला या कायद्याची खरी माहिती देण्यासाठी आणि भय दूर करण्याच्या उद्देशाने अभियान सुरू केले असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच त्यांनी आज (रविवारी) शहरातील मोहन नगरच्या मुस्लिम वस्तीत जाऊन मुस्लिम समाजातील नागरिकांच्या भेटी घेतल्या, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभारी सरोज पांडे या देखील उपस्थित होत्या.
हेही वाचा - 'ठाकरे' सरकारचे खातेवाटप जाहीर, अजित पवार अर्थमंत्री तर आदित्य ठाकरेंकडे पर्यटन