नागपुर - चार दिवस सुरू असलेल्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. या प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपुरात चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. याठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या शेतीविषयक तज्ज्ञ लोकांकडून माहिती घेतली.
हेही वाचा - हे गोवा नाही, महाराष्ट्र आहे, काहीही खपवून घेणार नाही; शरद पवारांचा भाजपला गर्भित इशारा
शेतीमध्ये शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञाचा उपयोग व्हावा, यासाठी नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून गेल्या ११ वर्षापासून अॅग्रो व्हिजन हे शेतीविषयक प्रदर्शन भरवण्यात येते. या कृषी प्रदर्शनात दरवर्षी लाखो शेतकरी हजेरी लावून नवनवीन शेती विषयक तंत्रज्ञानाची माहिती घेतात. यावर्षी सुद्धा या प्रदर्शनात देश विदेशातील शेती विषयक तंत्रज्ञान आणि त्या संबंधिचे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेती विषयाचे तज्ज्ञ याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. या प्रदर्शनाच्या समारोपावेळी बोलताना गडकरींनी शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा, असे सांगितले आहे.