नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार 31 डिसेंबरपूर्वी होऊ शकेल. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध होत असलेल्या आंदोलनावरही आपले मत मांडले. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. यावेळी विधानभवनाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?
विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सध्या सुरू आहे. अजित पवार यावेळी म्हणाले, "आजच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारातील मंत्री ठरवण्याचे अधिकार हे आमचे नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत." असे पवार म्हणाले. शुक्रवारी सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांना न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देणे मात्र टाळले.
हेही वाचा -...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते - नारायण राणे