नागपूर - प्रत्येक वर्षी 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त (National Pollution Control Day 2020) ईटीव्ही भारतचा उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा आणि कोराडी (Koradi And Khaparkheda Thermal Power Station) येथील दोन औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदुषणावर विशेष रिपोर्ट...
उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा आणि कोराडी (Koradi And Khaparkheda Thermal Power Station) येथील दोन औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे राज्यातील काही भागला वीज मिळत आहे. वीज मिळालेल्या लोकांचे जीवन प्रकाशमय होत आहे. तर दुसरीकडे वीज निर्माण होत असलेल्या गावाला मात्र जीवघेण्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. वीज निर्मित प्रकल्पांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांना तिलांजली दिली असून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. हे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून पुढे आले आहे. विद्युत प्रकल्पामुळे अनेकांच्या नशिबी विषारी पाणी, प्रदूषित हवा आली आहे.
विद्युत निर्मिती ( Power Generation) होत असलेल्या लगतच्या गावात हवा आणि पिण्याच्या पाण्यामध्ये आरोग्यास धोकादायक असे आर्सेनिक अल्युमिनियम, लिथियम विषारी धातू मोठ्या प्रमाणात मिळून आल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा हे दोन्ही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये कुठला खंड पडला नाही. पण याची मोठी किंमत स्थानिक नागरिकांना चुकवावी लागत आहे. सोबतच पर्यावरण भूजल आणि भूमीला, शेतकरी पुत्राला यांच्या धोकादायक परिणामांना समोर जावे लागत आहे. या दोन्ही प्रकल्पाचा विस्तार वाढत चालला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा मात्र विसर पडलेला दिसून येत आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सच्या अहवालात धक्कादायक बाबी आल्यात पुढे -
यामध्ये असर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ( CFSD ) आणि मंथन अध्ययन केंद्र अशा या तिन्ही संस्थांनी प्रकल्पा लगतच्या 21 गावातील 25 स्थळावरून पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यातून पाण्याचे नमुने वेगवेगळ्या ऋतुमध्ये घेण्यात आले. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सच्या अहवालात निकषानुसार असलेले मानाकापेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त प्रमाणात धातू मिळून आले. हे धातू हळूहळू पिण्याच्या पाण्या वाटे शरिरात जाऊन साठत आहे. त्यासोबत या परिसरात रहाणारे मन्यूष्य प्रत्येक श्वासा सोबत विषारी वायू शरीरात ऑक्सिजन म्हणून घेत आहे. यातूनच शरीर कर्करोग सारख्या गंभीर आजाराला बळी पडत आहे. हे फक्त माणसांना सोबत होत आहे असे नाही. तर या परिसरती गुरे ढोरे, पाळीव प्राणी, पशु पक्षी सर्व सजीव प्रजातीला प्रदूषणाचा प्रादुर्भावाचे चटके सहन करावे लागत आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी संस्थेने सुचवल्या विविध उपाययोजना -
यामध्ये उपाययोजना म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ते निर्देशानुसार करवाई करून प्रदूषण थांबवण्यासाठी महानिर्मिच्या विरोधात तातडीने पाऊले उचलावे. पाण्याच्या स्त्रोतमध्ये धूळ आणि पार्टीकलच्या स्वरूपात फ्लाय ऍश पसरवणे थांबवावे. उपायोजना करत नसल्यास प्रदूषण मंडळाने प्रकल्पाचे कामकाज थांबण्याचे कठोर पावले उचलून त्यावर नियंत्रण आणावे. नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक लोकांची समिती बनविण्यात यावी ज्यामध्ये सरपंच तसेच नागरिकांचाही समावेश असावा. स्थानिक नागरिकांना सध्या हे पिण्याचे पाणी पिण्या योग्य नसल्याने तात्काळ वाटर एटीएमची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे काही पर्याय उपाययोजना म्हणून सुचवण्यात आलेले आहेत.
जन जीवनावर काय परिणाम झाला -
या परिसरात आढळणाऱ्या या जीवघेण्या दूषित पाण्यामुळे अनेकांना कर्करोग श्वसनाचा, त्वचेचा आजार होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे जीवन या फ्लाय एशमुळे शेती उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याच परिणाम उत्पन्नावरही फार मोठा दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक संकट सुद्धा ओढावले आहे. दूषित पाणी पिल्याने गंभीर आजार शरीरात हळूहळू आपली जागा निर्माण करून मृत्युच्या दाढेत ओढले जात आहे. अनेकांना अल्झायमर सारखे आजारही होत आहे. त्याचबरोबर हाडे ठिसूळ होत असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची मागणी या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.