नागपूर- कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता युजीसीने देशातील सर्व विद्यापीठांना कोरोनाबाबत खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. येत्या काही काळात नागपूर विद्यापीठातील परीक्षांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर युजीसीच्या सुचनेला समोर ठेवून विद्यापीठ प्रशासनाने आपल्या अखत्यारितील प्रत्येक परीक्षा केंद्रांना कोरोनाबाबत पत्र पाठविले असून केंद्रांवर सॅनिटायझर किंवा हँडवॉश ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यापीठाच्या सुचनेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी किंवा गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना प्रभावित देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. परीक्षा केंद्रांवर किंवा महाविद्यालयात सर्दी खोकला असलेल्या विद्यार्थ्यांनी मास्क वापरावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर, नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिवांनी दिली आहे.
हेही वाचा- इम्रान सिद्दिकीवर गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, दोन आरोपी ताब्यात