नागपूर - जंगल, पर्यावरण आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या अभियंत्यांनी वन विभागाच्या मदतीसाठी खास आणि स्मार्ट कॅमेरे बनवण्याचे स्टार्टअप करण्याच्या निर्धार केला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत होत असलेल्या भारतीय बनावटीचे (स्वदेशी) मायक्रोप्रोसेसर स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. ज्यामध्ये टेक्नॉलॉजी इंजिनिअरींग फॉर नेचर (TERN टीईआरएन) अंतर्गत पाच मित्रांनी बनवलेला डेमो 8 हजार स्पर्धकांवर मात करत पहिल्या 100मध्ये पोहोचला आहे. हे स्टार्ट नेमके काय आहे? याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा.
चार मित्र नागपूरच्या रामदेवबाबा इंजिनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. यात ओंकार, मधूलिका डोळके, सुष्ट्री मेहतकर, रोहित हजारे यांचा समावेश आहे. हे सर्व जण नागपूरचे आहेत. तर त्यांचा आणखी एक सहकारी अभिनव चिलकर हा आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे. या पाचही जणांना जोडणारा समान धागा म्हणजे निसर्ग आणि वन्यप्राणी प्रेम आहे. यामुळेच त्यांनी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम नवीन टेक्नॉलीजीचा निसर्गाच्या दृष्टीने फायदा होण्यासाठी उपयोगात आणणार असल्याने मित्रांनी एकत्र येत काम सुरू केले आहे. यात त्यांनी नवीन स्टार्ट अप करण्यासाठी वन विभागाच्या मदतीला स्मार्ट कॅमेरे आणि डिव्हाईस बनवण्याचे प्रोजेक्ट तयार केला आहे.
यामध्ये केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाकडून आत्मनिर्भर भारत प्रकल्पा अंतर्गत स्वदेशी निर्मित कॉम्प्युटर आणि हार्डवेअरची गरज वाढत चालली आहे. यामुळे स्टार्टअप, उद्योग संस्थांना मजबुत करण्यासाठी येत्या काळाची गरज लक्षात घेऊन आयआयटी मद्रास (चेन्नई) आणि आयआयटी मुंबई C-DAC यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत पाच जणांना मिळून (TERN) या कंपनी अंतर्गत यात सहभागी झाले आहे.
दुर्गम भागात परिणामकारक ठरेल -
यात टीईआरएन अंतर्गत एक डेमो तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्मार्ट कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जंगल किंवा दुर्गम जंगल भागात असलेले जिथे कुठलेच नेटवर्क नसतानाही तो डेटा मिळवता येतो. हा प्रोजेक्ट तयार झाल्यास आणि मंजुर झाल्यास वनविभागाला मोठी मदत होईल. जो डेटा गोळा मिळवण्यासाठी दुर्गम भागात आव्हान, अडचणींना पार करावे लागते. त्यातून मुक्तता मिळणार आहे.
या स्पर्धेचा उद्देश सांगतांना अशा पद्धतीची संस्कृती उभारणे ज्यामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोगातून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. तसेच जागतिक आणि देशपातळीवर स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तयार करून त्याचा गरजा पूर्ण करत प्रगती साधण्यासही फायदा होईल, असे ओंकार केंकरे यांनी सांगितले. यामुळे या स्पर्धेत पहिल्या 100 मधून 25 प्रोजेक्ट्स निवडले जाऊन त्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. या 25 जणांना स्टार्टअपसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच बक्षीस म्हणून काही रक्कमही दिली जाईल, असे ओंकार यांनी सांगितले. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचणे ही सुद्धा गर्वाची बाब आहे. यासोबत प्रोजेक्ट नक्कीच वेगळा आणि दर्जेदार असल्याचा आनंद आहे, असे मधूलिका, सूष्ट्री आणि रोहित यांनी सांगितले.
वनविभागाला फायदा कसा? -
या प्रोजेक्टमध्ये हा कॅमेरा स्वयंचलित नेटवर्कवर काम करणार आहे. यामुळे हा डेटा एका प्रमुख ठिकाणी एकत्र होईल. यामध्ये डेटा चोरी होणे, गहाळ होणे, यासोबत आपात्कालीन परिस्थिती अलर्ट सेवा, यात मदत होईल, असेही निहाल रेड्डी यांनी सांगितले.