नागपूर - बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला ( Nagpur Rural Police ) आहे. रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डब्ल्यू.सी.एल. ( वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड )मध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली टोळीने तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना बनावट नियुक्ती पत्रासह आरोपींना केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये शिल्पा राजीव पालपर्ती, कुंदन कुमार उर्फ राहुल सिंग उर्फ रमेश शर्मा, मोहम्मद दानिश झिशान आलम उर्फ रशीद अन्वर आलम यांचा समावेश आहे तर मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
नागपूर जिल्ह्यातील सावनेरच्या खुरजगाव येथील प्रकाश आडे नामक तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा एका अशा टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळाले आहे. आरोपींनी तक्रारदार आडे यांच्या पत्नीला वेकोली किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन तब्बल 11 लाख रुपये वसूल केले होते. नोकरीचे आमिष दाखवून या टोळीने अनेक होतकरू बेरोजगारांच्या स्वप्नाचा चुराडा केला आहे. या टोळीचे सदस्य दलालांच्या माध्यमातून उज्वल भविष्याचे स्वप्न रंगवलेल्या बेरोजगारांना संपर्क साधायचे. त्यांना भारतीय रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डब्ल्यू.सी.एल.मध्ये पैशाच्या जोरावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनीही कसून तपास केला असता या
झाला आहे.
दलालाने केली होती आत्महत्या - या टोळीचा मुख्य दलाल अमित कोवे याने काही दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल आणि एसएमएस रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी या टोळीची प्रमुख शिल्पा पालपर्टीसह अन्य दोन आरोपींना अटक केली आहे.
अनेक बनावट नियुक्ती पत्र जप्त - पोलिसांनी आरोपींकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे आणि वेकोलीचे कॉल लेटर जप्त आहेत. आरोपींनी नागपूर जिल्ह्यातील 12 बेरोजगार तरुणांकडून तब्बल 1 कोटी 30 लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - Appeal of MSEDCL : बनावट ‘एसएमएस’वर नागरिकांनी विश्वास ठेवू नये- महावितरणचे आवाहन