ETV Bharat / state

नागपूर पोलिसांचा यवतमाळ येथे छापा; 785 रील नायलॉन मांजा जप्त

नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. नागपूर पोलिसांच्या झोन 1 च्या पथकाने थेट यवतमाळच्या मारवाडी चौकात पहाटे धाड टाकून तब्बल 785 रील नायलॉन मांजा जप्त केला आहे. बुधवारी नागपूरात एका इसमाकडे नायलॉन मांजाचा काही साठा आढळला होता. चौकशीत त्याने नायलॉन मांजा यवतमाळमधून येत असल्याचे सांगितले.

author img

By

Published : Jan 14, 2021, 8:19 PM IST

785 रील नायलॉन मांजा जप्त
785 रील नायलॉन मांजा जप्त

नागपूर - नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. नागपूर पोलिसांच्या झोन 1 च्या पथकाने थेट यवतमाळच्या मारवाडी चौकात पहाटे धाड टाकून तब्बल 785 रील नायलॉन मांजा जप्त केला आहे. बुधवारी नागपूरात एका इसमाकडे नायलॉन मांजाचा काही साठा आढळला होता. चौकशीत त्याने नायलॉन मांजा यवतमाळमधून येत असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच एक पथक यवतमाळला रवाना करण्यात आले. यावेळी मारवाडी चौकात एका गोदामात धाड टाकून घातक नायलॉन मांजाचे 785 रील जप्त केले आहे.

तीन दिवसांपूर्वी नागपूरच्या इमामवाडा येथे प्रणय ठाकरे या २१ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नायलॉन मांजाची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे पोलिसांवर या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी खऱ्या अर्थाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला नागपूरातून ताब्यात घेतले. त्यानंतर हा पुरवठा यवतमाळमधून होत असल्याची माहिती मिळाली. गुरुवारी सकाळी नायलॉन मांजच्या गोडाऊनवर छापा टाकून 785 रील नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी करणाऱ्यां विरोधात पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. काल नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. दिवसभरात 33 मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर यवतमाळ येथील पुरवठादराचे नाव पुढे आले आहे.
हेही वाचा - "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून लवकर निर्णय घेणार"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.