ETV Bharat / state

नागपुरात कोरोनापेक्षा 'सारी'चा कहर; आजार ठरतोय घातक - nagpur Corona update

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून समोर येत आहेत. सगळी आरोग्य यंत्रणा व प्रशासन कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा व कोरोनाचे रुग्ण बरे व्हावे, यासाठी दिवसरात्र परिश्रम करीत आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या संकट काळात 'सारी' आजाराने देखील डोकेवर काढले आहे.

nagpur news : SARI's disease is more deadly than Corona's
नागपूर : कोरोनापेक्षा 'सारी'चा आजार ठरतोय घातक
author img

By

Published : May 26, 2020, 3:06 PM IST

Updated : May 26, 2020, 3:45 PM IST

नागपूर - कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, यातच सारी आजाराने डोके वर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनापेक्षा सारीनेच जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सारीचा राज्यातील वाढता प्रसार पाहून आरोग्य खात्याने, सारी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असे निर्देश जारी केले आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून समोर येत आहेत. सगळी आरोग्य यंत्रणा व प्रशासन कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा व कोरोनाचे रुग्ण बरे व्हावे, यासाठी दिवसरात्र परिश्रम करीत आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या संकट काळात 'सारी' आजाराने देखील डोकेवर काढले आहे.

नागपुरातील परिस्थितीचा विचार केला तर कोरोनापेक्षा जास्त रुग्ण सारीमुळे दगावले आहेत. ११ मार्चला नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हापासून २२ मे पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४०८ वर पोहोचली. तर दुसरीकडे सारीच्या ५०३ रुग्णांची नोंद याच काळात झाली. तसेच ७ कोरोना बाधित रुग्णांना मृत्यू झाला आहे. तर याच काळात सारीमुळे १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सारी आजाराविषयी माहिती देताना डॉ. तुमाने...

विशेष बाब म्हणजे, कोरोनाची जी लक्षण आहेत तीच लक्षणे सारीचीही आहेत. यात कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप, दम लागतो. कोरोनापेक्षा सारीचा मृत्युदर हा अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सारी देखील विषाणूंमुळे होत असून लहान बालके व वृद्धांना याचा धोका अधिक असतो. गेल्या दोन महिन्यात शून्य ते बारा वर्षे वयो गटातील नऊ बालकांना शासकीय मेडिकल रुग्णालयात सारीचे रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर सात बरे झाले आहेत. तर एकावर उपचार सुरु आहे.

सारीच्या रुग्णांमध्ये सर्वच वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. सारीच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सारीच्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना धोका दिवसेंदिवस वाढत असतानाच सारी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा - नागपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर, तापमानाचा पारा ४६.७ अंशावर

हेही वाचा - विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोला ४७.४ तर नागपुरात ४७ अंश तापमानाची नोंद

Last Updated : May 26, 2020, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.