ETV Bharat / state

जिल्हा परिषद गमावली; नागपुरात पुन्हा भाजपची परीक्षा - nagpur mnc byelection news latest news

भाजप नगरसेवक जगदीश ग्वालावंशी यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून जगदीश ग्वालवंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

nagpur mnc
नागपूर महानगरपालिका, नागपूर
author img

By

Published : Jan 9, 2020, 3:02 PM IST

नागपूर - जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने येथे सत्ता गमावली. यानंतर आता महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 (ड) साठी गुरुवारी पोटनिवडणूक घेतली जात आहे. यामुळे याठिकाणी पुन्हा भाजपची कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषद गमावली; नागपुरात पुन्हा भाजपची परीक्षा

भाजप नगरसेवक जगदीश ग्वालावंशी यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून जगदीश ग्वालवंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून देखील माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला नशीब आजमावत आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपसोबतच काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

हेही वाचा - ..म्हणून भाजपच्या बालेकिल्ल्याला पडले भगदाड; 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट!

आज (गुरुवारी) होणाऱ्या मतदानानंतर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. यानंतरच जनतेचा कौल कुणाला? हे स्पष्ट होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा पराभव मिळाल्याने भाजपला कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे. मात्र, काँग्रेसनेसुद्धा पूर्णशक्ती पणाला लावल्याने निकालाची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. तर या निकालात कुणाचाही विजय झाला तरी महानगरपालिकेतील सत्तेवर कुठलाही याचा परिणाम होणार नाही.

Intro:नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12(ड) साठी आज पोट निवडणूक घेतली जात आहे...भाजप चे नगरसेवक जगदीश ग्वालावंशी यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणुक होत आहेBody:भाजप कडून जगदीश ग्वालवंशी यांच्या पुत्राला विक्रम ग्वालवंशी उमेदवारी दिली असून काँग्रेस कडून देखील माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला नशीब आजमावत आहे..पालिकेतील सत्ताधारी भाजल सोबतच काँग्रेस ने निवडुन प्रतिष्ठेची केली असून आज होणाऱ्या मतदानानंतर उद्या मतमोजणी नंतर जनतेचा कौल कुणाला हे होणार स्पष्ट होईल...सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा पराभव मिळाल्याने भाजपला कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची आहे पण काँग्रेसकडून सुद्धा पूर्ण शक्ती पणाला लावल्याने निकालाची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे...निकालात कुणाचा विजय होईल यावर महानगरपालिकेतील सत्तेवर कुठलाही परिणाम होणार नाही Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.