नागपूर- राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तैयारीचा शंखनाद झाला आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर शहर प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. दरम्यान शहर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी निवडणुकी संदर्भातील तयारीची माहिती दिली.
जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. या १२ मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी होणार. निवडणुकीच्या कामासाठी एकूण २१ हजार ९७० अधिकारी कार्यरत राहतील. जिल्ह्यात ४ हजार ४१२ मतदान केंद्र आहेत. त्यातील ५५ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघात महिलांसाठी विशेष असे सखी मतदान केंद्र राहील, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुद्गल यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७८ हजार मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये ७३ हजार मतदार हे १८-१९ वयोगटातील म्हणजे नवीन मतदार आहेत. विशेष म्हणजे, यात महिला मतदारांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुद्गल यांनी दिली.
हेही वाचा- नागपूर पालिकेतील ४ हजार कंत्राटी कामगार होणार कायम, निवडणुकीच्या तोंडावर शासनाचा निर्णय