ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचा हाहाकार, सलग पाच दिवसात ८५८४ रुग्णांची नोंद - nagpur corona in last 24 hours

उपराजधानी नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे गेल्या महिन्यातच सिद्ध झाले. या महिन्यात तर दिवसागणिक नागपुरात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे आकड्यावरून सिद्ध झाले आहे. आज सलग पाचव्या दिवशी नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या केवळ पाच दिवसांमध्ये नागपूरात ८५८४ रुग्णांची नोंद झाली आहे तर २१६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

nagpur corona update in last 24 hours
सलग पाचव्या दिवशी नागपूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
author img

By

Published : Sep 6, 2020, 12:15 AM IST

नागपूर - सलग चौथ्या दिवशीही नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात १७४१ रुग्णांची नोंद झाली असून नागपुरात एकूण रुग्णसंख्येचा आकडा ३८ हजार १३९ इतका झाला आहे. काल दिवसभरात नागपुरात एकाच दिवशी कोरोनाच्या १९६६ रुग्णांची नोंद झाली होती.

उपराजधानी नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे गेल्या महिन्यातच सिद्ध झाले. या महिन्यात तर दिवसागणिक नागपुरात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे आकड्यावरून सिद्ध झाले आहे. आज सलग पाचव्या दिवशी नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या केवळ पाच दिवसांमध्ये नागपूरात ८५८४ रुग्णांची नोंद झाली आहे तर २१६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या १७४१ रुग्णांपैकी ३३२ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. तर १४०५ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. आज १३४७ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४५७ इतकी झाली आहे. याशिवाय आज ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १२१६ इतका झाला आहे. सध्या नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६६.७५ टक्के इतके आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.