नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका कोरोना संशयित गर्भवतीचा मृत्यू झाला होता. यामुळे खळबळ उडाली होती. पण त्या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही येथील महिलेला, ५ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी भरती करण्यात आले होते. तिला निमोनिया झाला होता. मात्र तिच्यात कोरोनाची लक्षण आढळल्याने तिची कोरोना टेस्ट घेण्यात आली. चाचणीचे रिपोर्ट येण्याआधीच ६ मार्चला त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे चिंतेत भर पडली होती.
आज त्या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल मेडिकल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निदान झाले आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेही वाचा - आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तुकाराम मुंढे यांचा प्रेमळ सल्ला
हेही वाचा - नागपुरात कोरोनाचा धोका वाढला; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आयुक्त मुंढेंकडून घेतला शहराचा आढावा