ETV Bharat / state

Sana Khan Missing Case : भाजप नेत्या सना खान बेपत्ता होण्यामागे कोणाचा हात? पोलिसांचे हात रिकामेच - Sana Khan missing from Madhya Pradesh Jabalpur

भाजप नेत्या सना खान गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता ( BJP leader Sana Khan missing case ) आहे. तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे, मात्र तिच्याबद्दल काहीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी सनाला जीवे मारण्याच्या धमक्या ( Death threats to Sana Khan ) आल्या होत्या. जाणून घेऊया काय आहे हे मिसिंग मिस्ट्री ( Sana Khan Missing Mystery ) .

Sana Khan Missing Case
Sana Khan Missing Case
author img

By

Published : Aug 9, 2023, 5:44 PM IST

नागपूर : नागपूर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खानचे बेपत्ता प्रकरण ( BJP leader Sana Khan missing case ) अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. गेल्या 8 दिवसांत सना खानबाबत ( Sana Khan Missing Mystery ) कोणतीही माहिती समोर आली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सना खानचे शेवटचे लोकेशन 2 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे असल्याने ती जबलपूर येथून बेपत्ता झाल्याचे स्पष्टीकरण नागपूर पोलिसांनी दिले आहे. याशिवाय सना खान बेपत्ता झालेले ठिकाण जबलपूर असल्याने तिथल्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

सना खानसोबत घातपात? : सनाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, जबलपूर पोलिसांनी सना खान 2 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. सनाचे नातेवाईक गेल्या सहा दिवसांपासून जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. सना खानसोबत घातपात झाल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांचे पथक तपासात मध्य प्रदेशातील जबलपूर पोलिसांना मदत करत आहेत.

असा आहे बेपत्ता होण्याचा घटनाक्रम : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. सनाला जबलपूरमधील एकाने जीवे मारण्याची धमकी ( Death threats to Sana Khan ) दिली होती. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतरही तिच्यासोबत संपर्क न झाल्याने सना खानच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस सना खानचा शोध घेत आहेत.

सनाचे कुटुंबीय बघत आहेत वाट : सना खानचे नागपुरात राहणारे नातेवाईक 3 ऑगस्टपासून तिच्याशी संपर्क साधू शकले नसल्यामुळे चिंतेत आहेत. सना ज्या गुन्हेगाराला भेटायला जबलपूरला गेली होती, तोही बेपत्ता असल्याने हे प्रकरण आणखी वाढले आहे.

पोलिसांचा तपास सुरू : भाजप महिला नेत्या सना खान बेपत्ता झाल्यापासून आजतागायत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. जबलपूर पोलिसांच्या मदतीने पोलिसांची दोन पथके यावर काम करत असून तपासाचे धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत. सना खान 1 ऑगस्टला जबलपूरला गेली होती. त्यानंतर सनासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिचे नातेवाईक शोध घेण्यासाठी जबलपुरात तळ ठोकूण आहेत.

हेही वाचा -

  1. Sana Khan Missing Case : सना खान बेपत्ता प्रकरणाचे गुढ वाढले.. गुंड पप्पू साहूबरोबरील लग्नाचे कागदपत्रे आले समोर
  2. BJP Sana Khan Missing : बेपत्ता भाजपा नेत्या सना खानसोबत घातपात? वाचा पोलीस काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.