नागपूर : नागपूर अधिवेशनात ( Nagpur Assembly Session 10th Day ) अनेक आमदार त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडताता लक्षवेधींवर चर्चा करतात. आजही अनेक लोकप्रतिनीधी त्यांच्या मतदार संघातील प्रश्न उपस्थित करतील. यात स्थानिक मुद्दे, राज्यात सुरू असलेला भ्रष्ट्राचार आणि सार्वजनिक ठिकाणांचे होणारे नुकसान यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा अनेक मुद्द्यांचा समावेश ( Discussion On Attention Grabbing Instruction ) आहे.
शुक्रवारी दोन मोर्चे : जनकल्याण सामाजिक बहुसंस्थाकडून सुरेश डोंगरे यांच्या नेतृत्वात एक मोर्चा निघणार आहे. तर दुसरा मोर्चा महादुला संघर्ष समितीकडून निघणार आहे. सी. वाझे यांच्या नेतृत्वात महादुला संघर्ष समितीचा मोर्चा निघणार (Legislative Assembly morcha ) आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था : श्री. रविंद्र वायकर आदिवासी पाड्यातील नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या बाबीकडे आदिवासी विकास मंत्र्याचे लक्ष वेधणार ( tribal area Poor road condition ) आहेत. "मुंबईतील गोरेगांव पूर्व आरे कॉलनीमधील २७ आदिवासी पाडयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. आरे कॉलनीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक रहिवाशी बांधवाना रस्त्यांवरुन वाहतूक करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. वृध्द, लहान मुले, गरोदर महिला आदिंना गैरसोय होत आहे. याकरिता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करूनही विकास होत नाही. त्याकरता भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.
नैना प्राधिकरणाचा भोंगळ कारभार : प्रशांत ठाकूर, महेश बालदी, समीर कुणावार, श्रीमती मनिषा चौधरी, श्री. अमित साटम नवी मुंबईतील नागरिकांच्या अडचणी मांडणार ( Mismanagement in NANIA Project ) आहेत . “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिक्षेत्रात नगरनियोजनाकरिता शासनाने सिडको अंतर्गत नैना प्राधिकरणाची स्थापना केली. जवळपास आठ वर्षाचा कालावधी होऊनसुध्दा नैना प्राधिकरणाने गावठाण अंतर्गत कुठल्याही प्रकारे गावांचा विकास केला नाही. नैना अंतर्गत येणा-या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास शेकडो इमारती मोडकळीस आल्यामुळे राहण्यासाठी धोकादायक झाला आहे. नैनाच्या संवेदनहीन काराभारामुळे निरनिराळ्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. इमारतींच्या पुनर्विकासाअभावी गेल्या वर्षभरात इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.