ETV Bharat / state

Nagpur Girl Rape Case : औषध लावण्याच्या बहाण्याने युवतीवर 63 वर्षीय नराधमाचा अत्याचार; 'असं' फुटलं बिंग - sexually abused

झाडपाल्याचं औषध लावण्याच्या बहाण्याने घरी येणाऱ्या 63 वर्षीय नराधमाने युवतीवर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडितेने एका बाळाला जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम मनोहर काठोके याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Nagpur Girl Rape Case
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 18, 2023, 11:22 AM IST

Updated : Aug 18, 2023, 1:28 PM IST

नागपूर : गावठी झाडपाला लावण्याच्या बहाण्याने घरी येणाऱ्या 63 वर्षीय नराधमाने युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. नराधमाचा अत्याचार अनेकदा सहन करणाऱ्या या पीडितेने एका मुलीला जन्म दिल्यामुळे ही घटना उजेडात आली. मनोहर सखाराम काठोके असं अत्याचारी नराधमाचं नाव आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कपडे वाळण्यासाठी घालत असताना पीडितेला विजेचा धक्का लागला होता. त्यामुळे तिच्या अधू झालेल्या खांद्यावर आणि हातावर गावठी झाडपाल्याचा लेप लावण्यासाठी नराधम मनोहर काठोके हा पीडितेच्या घरी येत होता.

कपडे वाळवताना पीडितेला लागला होता विजेचा धक्का : पीडिता घरातील कपडे वाळवत असताना विजेचा धक्का लागून तिच्या खांद्याला आणि हाताला मार लागला होता. 2018 साली हा अपघात घडला तेव्हा पीडिता साधारण 15 वर्षांची होती. पीडितेच्या खांद्यावर आणि हातावर 'रामटेक' भागातल्या पाठक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. मात्र, तिच्या आई वडिलांनी तिला गावठी झाडपाल्याचं औषध देण्यासाठी महादुला परिसरात राहणाऱ्या मनोहर सखाराम काठोके याला सांगितलं होतं. मनोहर काठोके डिसेंबर 2019 पासून रोज सकाळी 10 वाजता पीडितेच्या घरी येऊन तिला झाडपाल्याचा लेप लावत होता. झाडपाल्याच्या औषधाने पीडितेला आराम पडत असल्याने तिच्यावर उपचार सुरूच राहिले.

फ्रॅक्चर असल्याने पीडिता हतबल : जानेवारी 2022 मध्ये पीडितेचे आई-वडील नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता कामाला गेले होते. तर तिचे भाऊ आणि बहीण शाळेत गेले होते. त्यादरम्यान मनोहर काठोके हा लेप लावण्यासाठी घरी आला. पीडितेच्या हाताला लेप लावताना त्याने तिला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे', असे सांगितले. यावेळी मनोहर काठोके याने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेचे दोन्ही हात आणि खांदा फ्रॅक्चर असल्याने ती त्याला विरोध करू शकली नाही. ती जोरात ओरडत असताना नराधमाने तिचे तोंड दाबून 'तू कोणाला सांगशील तर तुला ठार मारून टाकीन', अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेवर तो वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिला.

अत्याचारातून पीडितेने दिला मुलीला जन्म : नराधमाने दिलेल्या धमकीमुळे पीडिता हादरुन गेली होती. त्यामुळेच ती कोणालाच काही सांगत नव्हती. पीडितेने कोणाला काही न सांगितल्याने आरोपीची हिंमत वाढली. नराधम मनोहर रोज तिच्या घरी येत होता. रोज शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. 9 ऑगस्टला पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिने याबाबत नराधम मनोहर काठोके याला सांगितलं. रामटेक पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेला उपचारासाठी रिहान दवाखाना रामटेक मध्ये नेलं असता, ती 7 महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर नराधम मनोहरने दुसऱ्या दिवशी रामटेक इथल्या वात्सल्य हॉस्पिटलला नेलं. तिथेच तिची प्रसूती झाली आणि पीडितेने मुलीला जन्म दिला.

पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या : लैंगिक शोषणातून पीडितेने मुलीला जन्म दिल्याची घटना तिच्या आई-वडिलांना समजली. त्यामुळे त्यांनी पीडितेसह रामटेक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मनोहर काठोके विरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मनोहर काठोके विरोधात कलम 376 (2) (एन) 506 भादंविसह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 ( पोक्सो ) कलम 4, 5 (एल), 5 (जे) (2), 6, 8, 12 कायद्यान्वये गुन्हा नोंद केला असून आरोपी मनोहर काठोके याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. Thane Rape Case : धक्कादायक! क्लिनिक बंद करून २५ वर्षीय गतिमंद तरुणीवर डॉक्टरचा अत्याचार
  2. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
  3. Minor Girl Rape Case: चॉकलेटच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; कराड न्यायालयाने आरोपीस ठोठावली फाशीची शिक्षा

Last Updated : Aug 18, 2023, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.