ETV Bharat / state

मुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? आज निर्णय - माजी पंतप्रदान डॉ. मनमोहन सिंग

मुकुल वासनिक हे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथून खासदार म्हणून निवडून आले होते. तर, काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचा मोठा दबदबा असून ते गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत.

मुकुल वासनिक
author img

By

Published : Aug 10, 2019, 12:15 PM IST

Updated : Aug 10, 2019, 12:59 PM IST

नागपूर - राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत महाराष्ट्रातील माजी खासदार मुकुल वासनिक यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, यामध्ये मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

मुकुल वासनिक हे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथून खासदार म्हणून निवडून आले होते. तर काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचा मोठा दबदबा असून ते गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत. म्हणूनच त्यांच्या नावावर अंतिम मोहर उमटण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होवून आज जवळ-जवळ 3 महिने होत आहेत. तरीदेखील अजूनही काँग्रेस पक्षाला उत्तराधिकारी सापडलेला नाही. या 2 महिन्यांच्या कालावधीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या अनेक नेत्याची नावे पुढे आली आहेत. ज्यामध्ये माजी पंतप्रदान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश होता.

आगामी विधानसभा निवडणुकींना समोरे जाण्याच्या उद्देशाने शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतून काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे.

Intro:राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.... काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत महाराष्ट्रातील माजी खासदार मुकुल वासनिक यांच्या सह मल्लिकार्जून खरगे सचिन पायलट यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे, मात्र या मध्ये मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे 
Body:लोकसभा निवडनिक दारुण पराभव मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्याग केला होता..... लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याला आज जवळ-जवळ ३ महिने होत आहेत तरी देखील अजूनही काँग्रेस पक्षाला उत्तराधिकारी पक्षाला सापडलेला नाही..... या दोन महिन्यांच्या कालावधीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसच्या अनेक नेत्याची नावे पुढे आली ज्यामध्ये माजी पंतप्रदान डॉ मनमोहन सिंग,सुशीलकुमार शिंदे,या सह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश होता.....या आधी इतका काळ काँग्रेस पक्ष अध्यक्ष शिवाय राहिलेला नाही,भविष्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींना समोर जाण्याच्या उद्देशाने आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे..... या बैठकीला काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे,त्यामुळे आजच्या बैठकीतून आज काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे.... अध्यक्ष पदाच्या शर्यतीत महाराष्ट्रातील माजी खासदार मुकुल वासनिक यांच्या सह मल्लिकार्जून खरगे सचिन पायलट यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे, मात्र या मध्ये मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे... मुकुल वासनिक हे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथून खासदार म्हणून निवडून गेले होते...... काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचा मोठा दबदबा असून ते गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि विश्वासू  जातात,म्हणूनच त्यांच्या नावावर अंतिम मोहर उमटण्याची दाट शक्यता आहे 

टीप- मुकुल वासनिक यांचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याने,कृपया आपल्या कडे सेव असलेले फुटेज किव्हा फोटो वापरावेत

Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.