ETV Bharat / state

नागपुरात अक्षय तृतीयानिमित्त 'मुक्ती'ने घातले बेवारस आत्म्यांचे श्राद्ध - पिंडदान

एकिकडे आज जिवंत आई वडिलांना जेऊ घालण्यात असमर्थ असलेले मुले आई वडिलांच्या निधनानंतर कावळ्याला जेऊ घालण्यात धन्यता मानतात तर दुसरीकडे मुक्ती ही संस्था बेवारस आत्म्यांना मुक्ती मिळावी यासाठी सामाजिक बांधिलकीतून करत असलेल्या कार्याचे मोल कुणीही ठरवू शकत नाही.

नागपुरात अक्षय तृतीयानिमित्त 'मुक्ती'ने घातले बेवारस आत्म्यांचे श्राद्ध
author img

By

Published : May 7, 2019, 4:38 PM IST

Updated : May 7, 2019, 9:47 PM IST

नागपूर - अक्षय तृतीयानिमित्त आज(मंगळवार) नागपूरच्या मोक्षधाम दहन घाटावर बेवारस आत्म्यांच्या शांतीसाठी पिंडदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात दरवर्षी शेकडो मृतदेहांवर बेवारस म्हणून पोलिसांनी अंत्यविधी करावा लागतो, अश्या बेवारस आत्म्यांच्या शांतीकरता मुक्ती ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून अक्षयतृतीयेच्या दिवशी पिंडदान करत आहे.

नागपुरात अक्षय तृतीयानिमित्त 'मुक्ती'ने घातले बेवारस आत्म्यांचे श्राद्ध

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करताना कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते अशी मान्यता आहे. एवढेच नाही तर अक्षय तृतीयेकडे सोने आणि दागिने खरेदी करण्याचा मुहूर्त म्हणून देखील बघितले जाते. या शिवाय आजचा दिवस हा पितरांना अर्पण असल्याची देखील मान्यता आहे, म्हणूनच अक्षयतृतीयाला पिंडदान करण्याची परंपरा आहे.

परंपरेनुसार आज घरातील पितरांना जेवण घातले जाते. एरवी घराच्या भिंतीवर बसणाऱ्या कावळ्याला पळवून लावणारे आज मात्र कावळ्याला पितर मानून आज त्याचा धावा करतात. अनेक वर्षांच्या रूढी परंपरेनुसार घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याद्वारे मृत आत्म्यासाठी पूजा केल्यानंतर घरात शिजलेले अन्न कावळ्याला अर्पण करतात पण ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाठीमागे कोणीही नाही अशा मृत आत्म्यांचे पिंडदान कोण करेल असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. अश्या बेवारस आत्म्यांच्या शांतीसाठी नागपुरातील मुक्ती नावाची संस्था दरवर्षी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सर्व बेवारस आत्म्याचे पिंडदान करून श्रद्धा घालण्याचा नित्यक्रम पाळत आहे.

आजही नागपूरच्या मोक्षाधाम येथे विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५ वर्षांपासून हा नित्यक्रम सुरू आहे. २५ वर्षापूर्वी जेव्हा नागपूर जिल्ह्याच्या मोवाड येथे आलेल्या महापुरात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यावेळी त्या मृतकांना नातेवाईक मिळू न शकल्याने मुक्ती या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन त्या शेकडो मृतकांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे श्राद्ध घातले होतो. तेव्हापासून सुरू झालेली परंपरा आजही पाळली जात आहे. यावेळी

एकीकडे आज जिवंत आई वडिलांना जेऊ घालण्यात असमर्थ असलेले मुले आई वडिलांच्या निधनानंतर कावळ्याला जेऊ घालण्यात धन्यता मानतात तर दुसरीकडे मुक्ती ही संस्था बेवारस आत्म्यांना मुक्ती मिळावी यासाठी सामाजिक बांधिलकीतून करत असलेल्या कार्याचे मोल कुणीही ठरवू शकत नाही.

Intro:अक्षय तृतीया निमित्य आज नागपूरच्या मोक्षधाम दहन घाटावर बेवारस आत्म्यांच्या शांतीसाठी पिंडदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....शहरात दरवर्षी शेकडो मृतदेहांवर बेवारस म्हणून पोलिसांनी अंत्यविधी करावा लागतो,अश्या बेवारस आत्म्यांच्या शांतिकरिता मुक्ती ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून अक्षयतृतीयेच्या दिवशी पिंडदान करत आहे

Body:साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करताना कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते अशी मान्यता आहे....एव्हढंच नाही तर अक्षयतृतीयेकडे सोन आणि दागिने खरेदी करण्याचा मुहूर्त म्हणून देखील बघितले जाते....या शिवाय आजचा दिवस हा पितरांना अर्पण असल्याची देखील मान्यता आहे,म्हणूनच अक्षयतृतीयाला पिंडदान करण्याची परंपरा आहे....परंपरेनुसार आज घरातील पितरांना जेऊ घातले जाते....एरवी घराच्या भिंतीवर बसणाऱ्या कावळ्याला पळवून लावणारे आज मात्र कावळ्याला पितर मानून आज त्याचा धावा करतात....अनेक वर्षांच्या रूढी परंपरे नुसार घरातील जेष्ठ व्यक्ती आपला द्वारे मृत आत्मासाठी पूजा केल्या नंतर घरात शिजलेले अन्न कावळ्याला अर्पण करतात पण ज्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पाठीमागे कोणीही नाही अश्या मृत आत्म्यांचे पिंडदान कोण करेल असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो...अश्या बेवारस आत्म्यांच्या शांती करिता नागपुरातील मुक्ती नावाची संस्था दरवर्षी अक्षयतृतीया च्या मुहूर्तावर सर्व बेवारस आत्म्याचे पिंडदान करून श्रद्धा घालण्याचा नित्यक्रम पाळत आहे...आजही नागपूरच्या मोक्षाधाम येथे विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते...सुमारे 25 वर्षांपासून हा नित्यक्रम सुरू आहे...25 वर्षापूर्वी जेव्हा नागपूर जिल्ह्याच्या मोवाड येथे आलेल्या महापुरात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता,त्यावेळी त्या मृतकानां नातेवाईक मिळू न शकल्याने मुक्ती या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन त्या शेकडो मृतकांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे श्राद्ध घातले होतो,तेव्हा पासून सुरू झालेंली परंपरा आजही पाळली जाते आहे....या वेळी संत कबिरांचा दोहा सांगावासा वाटतोय
जिंदा बाप को कोई न पूजे....मरे बाद पुजवाये....मूठ्ठी भर चावला लेकर, कवै को बाप बनाये
एकीकडे आज जिवंत आई वडिलांना जेऊ घालण्यात असमर्थ असलेलले मुलं आई वडिलांच्या निधनानंतर कावळ्याला जेऊ घालण्यात धन्यता मानतात ...तर दुरीकडे मुक्ती ही संस्था बेवारस आत्म्यांना मुक्ती मिळावी या करिता सामाजिक बंधीलकीतून करत असलेल्या कार्याचे मोल कुणीही ठरवू शकत नाही

Conclusion:
Last Updated : May 7, 2019, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.