नागपूर : २०१९ मध्ये राज्यातल्या लोकांना हवे असलेले सरकार खऱ्या अर्थाने कौल दहा महिने अगोदर सत्तेत आले आहे. या दहा महिन्यात साडेबारा हजार कोटी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे सर्वांना आपला मुख्यमंत्री असल्याचे जाणवत आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
राजकारणातील टीकेचा स्थर घसरला : राज्याच्या राजकारणात टीकेचा स्तर घसरलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदूषित करण्याचे काम सध्या सुरू आहे. सकाळपासून शिवा शाप देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. महाराष्ट्रात आपसातच एकमेकांवर टीका होताना दिसून येत आहे. सत्तेसाठी विचारांना बाजूला करून हे एकत्र आले आहे. वज्रमुठ एकजूट दाखवत आहे, ती वज्रमुठ राहते का हे पाहावे लागतील.
निकाल आमच्या बाजूने लागला : सत्ता संघर्षात निवडणूक आयोगाच्या निकाल आमच्या म्हणजेच सत्याचा बाजूने लागला आहे. आज बहुमत आमच्याकडे आहे.
आदित्य ठाकरे कंत्राटदाराची भाषा बोलणारे पुढारी : मुंबई शहरातील रस्तेबांधणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेने केला आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले आहेत. आदित्य ठाकरे कंत्राटदाराची भाषा बोलणारे पुढारी आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले आहेत. आदित्य ठाकरे कंत्राटदाराची भाषा बोलणारे पुढारी आहेत - श्रीकांत शिंदे
पक्ष मोठा करण्याचा सर्वांना अधिकार : आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की सगळ्याना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. लोक दिवसा स्वप्न पाहतात,आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.
- हेही वाचा : Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना
- हेही वाचा : Major Road Accident In MP : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये प्रवासी बस पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू
- हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Statue: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा