नागपूर - जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच, मागील तीन दिवसात सक्रिय रुग्णांची 2 हजाराने घट झाली आहे. शनिवारी आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. यात 6576 नवीन कोरोनाबधितांची भर पडली. तेच 7 हजार 575 जंणानी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच बाधितांपेक्षा 999 अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी नागपूर जिल्ह्यात 23 हजार 259 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 6 हजार 576 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागातील 4773 तर ग्रामीण भागातील 2802 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 99 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागातील 55, तर ग्रामीण भागातील 32 तर जिल्ह्याबाहेरील 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यासोबतच शनिवारी 7 हजार 575 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्येत मागील दोन दिवसात घट होऊन 76 हजार 726 वरून 75608 वर आली आहे. आत्तापर्यंत 3 लाख 31 हजार 268 जण कोरोनामुक्त झाले आहे.
पूर्व विदर्भात मृत्यू आणि बाधितांच्या संख्येत घट....
शुक्रवारी पूर्व विदर्भात 10 हजार 347 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 12 हजार 571 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 2226 रुग्ण हे अधिकचे बरे झाले आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मिळून 181 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधितांच्या तुलनेत आणि मृत्यू ससंख्ये सहा जिल्ह्यात घट दिसून आली आहे.