ETV Bharat / state

MLA Ravi Rana : उद्धव ठाकरेंनी उमेश कोल्हे हत्या प्रकरण दडपण्याचे पोलिसांना दिले होते आदेश - रवी राणा यांचा आरोप

अमरावतीत नुपूर शर्मा यांची पोस्ट वायरल केल्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात (Ravi Rana On Umesh Kolhe murder case) आली, असे एनआयएने अहवालात स्पष्ट केले. हे प्रकरण दडपण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना हे प्रकरण दडपण्याचे आदेश दिले (Ravi Rana allegation On Uddhav Thackeray) होते, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

MLA  Ravi Rana
रवी राणा, आमदार
author img

By

Published : Dec 20, 2022, 2:25 PM IST

नागपूर : अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने जो रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळेच कोल्हे कुटुंबियांना न्याय मिळाल्याचे आमदार रवी राणा म्हणाले आहेत. नुपूर शर्मा यांची पोस्ट वायरल केल्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली, असे एनआयएच्या रिपोर्टमध्ये असल्याचे रवी राणा म्हणाले. महविकास आघाडी सरकारच्या काळात उमेश कोल्हे यांची हत्या (Umesh Kolhe murder case) झाली होती. उमेश कोल्हे हत्या प्रकरण अतिशय संवेदनशील असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना हे प्रकरण दडपण्याचे आदेश दिले होते, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला (Ravi Rana allegation On Uddhav Thackeray) आहे.

काय आहे प्रकरण? नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तपासानंतर अमरावती शहर पोलीसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अमरावती पोलीसांनी ही माहिती (Ravi Rana On Umesh Kolhe murder case) दिली.

वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन : कट्टरपंथी लोकांच्या टोळीने केलेले दहशतवादी कृत्य असल्याचे एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटले आहे. एनआयएने म्हटले की, कोल्हे यांनी कथितपणे धार्मिक भावना दुखवणाऱ्या व्यक्तींची हत्या करून नवीन उदाहरण तयार करण्याचा या कट्टरपंथीय टोळीचे उद्दिष्ट होते. कोल्हे यांनी 21 जून रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली (murder of Umesh Kolhe) होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.