नागपूर - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनो, कोरोना गो, अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओची ट्रोलरनेही चांगलीच थट्टा केली. यावर आज आठवले यांनी माझ्या नाऱ्यामुळे सारा देश जागा झाला, असे स्पष्टीकरण त्यांच्याच शैलीत दिले.
नागपुरात ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी आठवले यांना त्यांच्या शैलीत एक कविताही सादर केली. ते पुढे म्हणाले, मी माझ्या पक्षाचे देशभरातील कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले. तसेच गर्दीचे ठिकाणे म्हणजेच नाट्यगृहे, सिनेमागृहे, मॉल अजूनही सुरू आहेत. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन