नागपूर - उपराजधानी नागपूरात आज 15 फिरत्या पशु चिकित्सलयाचे लोकार्पण पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. हे 15 वाहन म्हणजे सुसज्ज पशु दवाखाना असून हे पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात धावणार आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत हे चिकित्सालय सुरू करण्यात आले. 1962 या टोलफ्री नंबरवर 'शासन आपल्या दारी' या युक्तीप्रमाणे दवाखाना ग्रामीण भागात पोहचणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यावेळी म्हणाले.
घरापपर्यंत पोहोचून पशुपालकांना सेवा देण्याचे काम -
पशु दवाखाने हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असले, तरी प्रत्येक गावात नसतात. यामुळे बरेचदा त्या दवाखान्यात पशुंना नेताना अनेक अडचणींचा सामना पशुपालकांना करावा लागतो. यासह वाहतूक आणि उपचार खर्च वाढून आर्थिक भुर्दंड देणारा असतो. यामुळे आता 1962 या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यानंतर हा फिरता दावखाना घरापपर्यंत पोहोचून पशुपालकांना सेवा देण्याचे काम करणार आहे. ज्यामध्ये पशु वैदकीय अधिकारी हे पोहचून योग्य औषध उपचार करणार आहे. गरज पडल्यास शस्त्रक्रिया आणि पुढल्या उपचाराचे नियोजन केले जाणारा हा उपक्रम असणार आहे.
बर्डफ्ल्यू संपण्याच्या मार्गावर -
बर्डफ्ल्यूने माणसे मरत नाही. पण नुकसान मात्र पोल्ट्री व्यवसायिकांचे होत असते. महाराष्ट्रात बर्डफ्ल्यू आटोक्यात आला आहे. नंदुरबार भागात थोड्या प्रमाणात आहे. तोही येत्या आठ दिवसात संपले, असे मंत्री केदार म्हणाले. बर्डफ्ल्यूपासून घाबरण्याचे कारण नाही. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना राज्यसरकारकडून मदत म्हणून जवळजवळ 90 रुपये प्रतिपक्षी मदत दिली जाते. पोल्ट्री व्यवसाय हा तीन चार महिन्याचा असल्याने इन्शुर्सन स्कीमकडे दुर्लक्ष करतात. पण अंडे देणाऱ्या पक्ष्यांचे इन्श्युरन्स काढल्यास अश्यावेळी मदत मिळण्यास फायदा होईल, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केले.
फिरत्या पशुचिकित्साल्यात काय सुविधा असेल -
सुसज्ज फिरत्या पशुचिकित्सालयात 77 प्रकारच्या वस्तू ठेवल्या जाणार आहे. यामध्ये औषध असणार आहे. सोबतच लहान मोठ्या शस्त्रक्रिया करता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. गरज पडल्यास काही तपासण्या करण्याच्या अनुषंगाने लॅबला लागणारे साहित्य या व्हॅनमध्ये उपलब्ध असणार आहे. इंजेक्शन साठवणुकीसाठी दोन छोटे फ्रिजर असणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती यात लागणाऱ्या डिस्प्ले स्क्रीनवर दाखवली जाणार आहे. सोबत अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत जनजागृती केली जाणार आहे.
15 फिरते चिकित्सालय -
हे फिरते चिकित्सालय असून नागपूर जिल्ह्यासाठी 3, वर्धा 1, गोंदिया 2, भंडारा 3, चंद्रपूर 4 तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 2 वाहने असणार, अशी माहिती नागपूर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी युवराज केने यांनी दिली.
हेही वाचा - 'तुम्ही 17 महिन्यांच्या हिशेबाची मागणी करता, 70 वर्षांचा हिशेब दिला काय?'