ETV Bharat / state

समृद्धीच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर; नवनिर्माणाधीन कमान कोसळली, एक ठार - कमान कोसळली

नागपूर ते सेलू बाजार अशा पहिल्या टप्प्यातील अनेक निर्माण कामे अद्याप पूर्णत्वास गेली नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल अशी शक्यता होती. दरम्यान महामार्गाच्या सुरुवातीला असलेली नवनिर्माणाधीन कमान कोसळली आहे.

नवनिर्माणाधीन कमान कोसळली
नवनिर्माणाधीन कमान कोसळली
author img

By

Published : Apr 26, 2022, 10:13 AM IST

नागपूर - पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेला आहे. याआधी सुद्धा अनेकवेळा या महामार्गाच्या उद्घाटनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.

समृद्धीच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर; नवनिर्माणाधीन कमान कोसळली

उद्घाटनाची घाई का? - नागपूर ते सेलू बाजार अशा पहिल्या टप्प्यातील अनेक निर्माण कामे अद्याप पूर्णत्वास गेली नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल अशी शक्यता होती. दरम्यान महामार्गाच्या सुरुवातीला असलेली नवनिर्माणाधीन कमान कोसळली आहे. या अपघातात एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्यातील मार्गाचे उद्धाटन २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र महामार्गावरील काही कमानींचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यातच आता महामार्गावरील १६ व्या क्रमांकाची कमान कोसळली आहे. त्यामुळे काम पूर्ण झाले नसताना उद्घाटनाची घाई का केली जाते आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य विकास महामंडळाचे स्पष्टीकरण - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या १५ व्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे ( Wild life over pass ) काम प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पध्दतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. काम अंतिम टप्यात असताना त्यातील १०५ पैकी काही Arch Strips ला अपघाताने हानी पोहचली आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करुन नवीन पध्दतीचे सुपर स्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले असल्याचे जाहीर केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.