नागपूर : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बंडानंतर सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यांना हटवण्याचा प्रश्नच येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहणार आहेत. मात्र विरोधक त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचा हल्लाबोस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतो : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर आठ आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदली होऊ शकते, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतो असा दावाच संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणताही नेता नाराज नाही. आमचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले होते.
एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला 200 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. कोणताही नेता नाराज नाही आणि सर्वांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असेही यावेळी शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले होते. रविवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार होणार अपात्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करत भाजप सोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल लवकरच लागणार असून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी मुखपत्रातून केला होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम केला आहे. मात्र यावेळी 'डील' निश्चित झाली आहे. अजित पवार केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी गेले नाहीत. लवकरच एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवारांचा राज्याभिषेक होईल असा दावाही शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला होता.
हेही वाचा -