ETV Bharat / state

उद्यापासून नागपूर कारागृहात लॉकडाऊन - अनिल देशमुख

author img

By

Published : Apr 30, 2020, 10:03 PM IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. उद्यापासून (शुक्रवार) नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात टाळेबंदी लागू केल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

Lockdown in Nagpur jail from tomorrow
उद्यापासून नागपूर कारागृहात लॉकडाऊन

नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. उद्यापासून (शुक्रवार) नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात टाळेबंदी लागू केल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत कोणीही कारागृहाच्या आत किंवा बाहेर जाऊ शकणार नाही.

अनिल देशमुख, गृहमंत्री

या आधीच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक कारागृहांना लॉकडाऊन करण्यात आले आहे. ज्यामध्ये मुंबईतील ऑर्थर रोड कारागृह, भायखळा कारागृह, ठाणे, कल्याण येरवडा, औरंगाबाद, नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहांचा समावेश होता. आता राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपुरातील कारागृहही लॉकडाऊन करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.