ETV Bharat / state

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; सरसकट दोन लाखांच्या कर्जमाफीची घोषणा - cm uddhav announed in winter session nagpur

ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Vidhanbhavan nagpur
विधानभवन, नागपूर
author img

By

Published : Dec 21, 2019, 6:09 PM IST

नागपूर - राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट 2 लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा फुले योजनेंतर्गत ही कर्जमाफी मिळणार आहे. योजनेचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मार्चमध्ये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सभागृहात सांगितले आहे. यासोबतच गोरगरिबांना 10 रुपयांत शिव-भोजन देणार, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवारी) विधानसभेत घोषणा केली.

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत जाहीर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना मार्च २०२० पासून सुरु होणार आहे. सर्व अटी- शर्तीविरहीत ही कर्जमाफी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. संपूर्ण योजनेत पारदर्शकता राहील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

2015 पासून थकीत असलेल्या कर्जाच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करायची गरज नाही. रांगेत उभे राहायची गरज नाही. ऑनलाईन अर्ज आणि फोटो टाकण्याची गरज नाही. बायकोला घेऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांचा मोकळेपणाने कर्जमुक्त करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'जनादेशाचा अनादर करणारे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

35 हजार कोटींची घोषणा करून 8 हजार कोटींची कर्जमाफी देणे फसवणूक होती. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले. तर सरसकट 2 लाखांचे कर्ज माफ केले. मात्र, सातबारा कधी कोरा होणार ते सांगा? असा आक्षेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सरकारचा निषेध करून भाजप सदस्यांनी यानंतर सभात्याग केला.

Intro:Body:mh_mum_asembly_cm_loan_waiver_day6_nagpur_7204684

Vijay Gaikwad wkt live3G

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार महात्मा फुले कर्ज मुक्ती
- सरसकट दोन लाखांच्या कर्जमाफीची घोषणा

गोरगरिबांना दहा रुपयात शिव-भोजन देणार उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर: राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले असून नागपुर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांनासाठी कर्जमाफीची घोषणा केली.या योजनेचा पहिला टप्पा शेतकर्यांना मार्च मध्ये मिळणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात सांगितले आहे.

“गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज २ लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे.” ,असं मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं.
मार्च २०२० पासून महात्मा फुले कर्जमुक्त योजना सुुरु होणार असून अटी- शर्तीविरहीत कर्जमाफी करणार आहे.शेतकर्यांना सरसकट २ लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार असून संपूर्ण योजनेत पारदर्शकता राहील असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. गोरगरिबांना दहा रुपयात शिव-भोजन देणार उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा केली.

2015 पासून थकीत असलेल्या कर्जाचा कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करायची गरज नाही. रांगेत उभं राहायची गरज नाही. ऑनलाईन अर्ज आणि फोटो टाकण्याची गरज नाही. बायकोला घेऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही .आमचं सरकार शेतकऱ्यांचा मोकळेपणाने कर्जमुक्ती करत आहे.
35 हजार कोटी ची घोषणा करून आठ हजार कोटीची कर्जमाफी देणे फसवणुक होती. मी उद्धव ठाकरेंचा अभिनंदन करतो ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल
अशी जयंत पाटील यांची विधानसभेत माहिती दिली.सरसकट दोन लाखाचे कर्ज माफी केली; परंतु सातबारा कोरा कधी होणार ते सांगा? असा आक्षेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सरकारचा निषेध करून आम्ही सभात्याग करतो; विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची घोषणा भाजप सदस्यांचा सभात्याग केला.
Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.