ETV Bharat / state

'मंदिरात तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, बाहेर आल्यावर प्रतिक्रिया देणं आपल्याला जमत नाही'; जितेंद्र आव्हाडांचा पत्रकारांपुढे टोला

Jitendra Awhad : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. त्या सोहळ्यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केलाय.

Jitendra Awhad  News
जितेंद्र आव्हाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 8:39 PM IST

प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड

नागपूर Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून मला आणि माझ्या आई बहिणींना ज्या प्रमाणे शिव्या दिल्या जात आहे. त्यावर मी एक प्रश्न विचारला होता की, श्रीराम हे क्षत्रिय आहेत की नाही. ही वैचारिक लढाई आहे. विपरीत परिस्थितीत चुप राहण्याशिवाय आता पर्याय नसल्याचं ते म्हणाले आहेत. राम आमचाच म्हणतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात रामाबद्दल आदराची भावना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने रामटेकला यायला पाहिजे, अधर्माशी लढेन आणि सीतेला परत घेऊन येईन याची प्रतिज्ञा रामाने रामटेकमध्ये घेतली होती, असंही ते म्हणालेत.

पूर्वज इंग्रजांशी का भांडले तेच कळत नाही : विचार मांडला की आई बहिणीच्या शिव्या मिळत आहेत. मात्र न बोलण्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील. देशात पेटलेल्या महागाई, महिला अत्याचार आणि बेरोजगारीवर ते काहीचं बोलत नाही. आज अशी अवस्था आहे की, आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले तेच कळत नाही. बाबासाहेबांनी काय काय म्हणून केलं नाही. डॉ. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे आर्थिक उन्नतीचं साधन म्हणून दिलं नव्हतं. ज्यांना शिक्षण, घर नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आरक्षण दिलं आहे. माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हणत नाही असं सांगून, न्यायालयात जातीचा वास येतो असं मी म्हणालो नाही असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. माझ्या आईला कोणीही पूजेला बोलवत नव्हतं. चातुर्वर्ण्य जेव्हा समजला तेव्हा समजलं की आईला पूजेला का बोलवत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

वैचारिक संघर्ष करायला तयार आहे : शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं, तेंव्हा त्याचं उत्तर काय द्यावं. आज जो हिंदू धर्म दिसत आहे, तो शंकराचार्यांमुळे असेल तर तुम्हाला हिंदू धर्म माहीत नाही. आम्ही वैचारिक संघर्ष करायला तयार आहे.

२२ जानेवारीलाचं का : २२ जानेवारी विशेष पूजा पाठ करण्याचा दिवस नाही. अनेक वर्षांपासून रामाच्या नावावर निवडणूक लढली जात आहे. आता प्रसाद वाटतील, नंतर रामाची पुस्तकं काढून वाटतील. आम्ही विसरलो की, रामाचा पहिला शिलान्यास राजीव गांधींनी केला. दुसऱ्यांदा शिलान्यास केला जात नाही. तीन किलोमीटर दूर राम मंदिर निर्माण होत आहे. आम्ही २२ जानेवारीला जाणार नाही. तर २४ जानेवारीला दर्शन घेऊ. त्यासाठी आम्हाला निमंत्रण कशाला हवं. आम्हाला जेंव्हा दर्शनसाठी जायचं तेंव्हा जाऊ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण का दिलं नाही, हा प्रश्न उपस्थित केलाय. तुम्ही याच तारखेला अयोध्येला दर्शनासाठी या हा आग्रह कशाला, जेंव्हा जयचे तेंव्हा जाऊ.

गुजरात आणि चित्रपट श्रुष्टीचा काय संबंध : चित्रपट सृष्टी मुंबईतच आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत जे श्रेष्ठ कलाकार आहेत ते बहुतांश पाकिस्तानातून आले होते. सामाजिक प्रश्नावर चित्रपट बनले. अचानक काही संबंध नसताना चित्रपट सृष्टी गुजरातला घेऊन जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. गुजरात आणि चित्रपट सृष्टीचा काय संबंध? असा प्रश्न त्यानी विचारला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास आणि मुंबई यांना वेगवेगळे करता येणार नाही, असं आव्हाड म्हणाले.

हेही वाचा -

  1. जितेंद्र आव्हाड वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत वादाच्या भोवऱ्यात, आव्हाड आणि वाद काय आहे समीकरण?
  2. आव्हाडांनी संस्कृत वाचलं नसेल, अर्थाचा अनर्थ केला; कथाकार अनिरुद्धाचार्य यांची टीका
  3. भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.