नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसला नागपूरकर ( Indian Science Congress Exhibition ) नागरिक तसेच विद्यार्थी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. विज्ञान, तंत्रज्ञानसोबतच इतिहासाचे पान उलगडणारा एका स्टॉल प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरतो आहे. आरएफआरएफ म्हणजेच ( रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशन ) च्या स्टॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित अनेक हस्तलिखित दत्ताऐवज ठेवण्यात आले आहे. यामध्येच एक पत्र देखील ( Chhatrapati Shivaji Maharaj Last Letter Exhibition ) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले ते शेवटचे पत्र असल्याचे रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे पत्रातील मजकूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले शेवटचे पत्र मासाहेब जिजाऊंना लिहिलेले आहे. या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद केली होती. मात्र एक परिवार असा होता ज्याने स्वराज्याची इमाने इतवारी सेवा केली. त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. त्यांना वतनदारी सुरू ठेवता यावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलेले ( Tukdoji Maharaj Nagpur University ) आहे. रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशन ही संस्था ( Research for Resurgence Foundation ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय शिक्षण मंडळाअंतर्गत काम करणारी संस्था आहे. या संस्थेने जगभरातील हजारो हस्तलिखिते एकत्र केली ( Chhatrapati Shivaji Maharaj Documents ) आहेत. इतिहासाचा ठेवा जतन करून तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्येय या संस्थेने जोपासला आहे. रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशनच्या स्टॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले शेवटचे पत्र बघण्याकरिता नागपूरकर गर्दी करत आहेत. त्या ठिकाणी प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ छायाचित्र देखील ठेवण्यात आलेले आहे.
सोन्याच्या शाईने लिहिलेली कुराण हटवली : रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशनच्या प्रदर्शनात सोन्याच्या शाईने लिहिलेल्या दुर्मिळ कुरणाची एक प्रत ठेवण्यात आली होती. अश्या प्रकारच्या चार प्रत उपलब्ध असून त्यापैकी एक प्रत नागपुरात आणण्यात आली होती हे कुराण सोळाव्या शतकात सोन्याच्या शाईने लिहिले गेले. कुरणात एकूण 385 पाने असून ही प्रत हैदराबादच्या निजामाच्या दीवानाच्या कुटुंबाने संस्थेला दिली आहे. पहिल्या दिवशी या कुराणाची प्रत प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. मात्र अवघ्या काही तासातच ती प्रत प्रदर्शनातून हटवण्यात आली. यामागे सुरक्षेचे कारण असल्याचे रिसर्च फॉर रिसर्च फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.