नागपूर - शाळा सुरू होऊन दोन महिने झाले. परंतु नागपूर जिल्ह्यातील तब्बल 13 हजार ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांना गणवेशाचे वाटपच झालेले नाही. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी या विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच उपस्थित रहावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या या लेटलतीफ कारभाराचा फटका विद्यार्थांना बसतो आहे.
गणवेश शिस्तीचे प्रतीक मानले जाते. परंतु, स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांकडे गणवेश नसतील तर ही गंभीर बाब आहे. तब्बल १३ हजार विद्यार्थी गणवेशाविना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ कारभाराचा फटका ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसतो आहे. विदर्भातील शाळा सुरू होऊन २ महिने झाले. परंतु, नागपूर जिल्ह्यातील तब्बल १३ हजार ओबीसी आणि खुल्या वर्गातील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील मुली आणि एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहे. पण ओबीसी आणि खुल्या वर्गातील विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ग्रामिण भागातील गरिब शेतकरी, शेतमजूर करणाऱ्यांची मुले शिकतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते गणवेश घेवू शकत नाही. सरकारी योजनेतून गणवेश न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्हा परिषदेने २० लाखांची तरतूद केली. परंतू हा निधी पुरेसा नाही आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, असे अधिकारी सांगतात.