नागपूर - नागपुरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. आज नागपूरचे तापमान ४७ अंशांवर पोहोचले असून ४८ अंशांकडे वाटचाल करत आहे. नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास होत असून ते दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. यामुळे नागपुरात जणू अघोषित संचारबंदीच लागू झाल्याचे चित्र आहे.
यावर्षी दुष्काळासह पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. तसेच आवकाळी पावसाचा पत्ता नाही. उलट तापमानात प्रचंड वाढ होत असून उन्हामुळे मनुष्य आणि मुक्या प्राण्यांचीही लाही-लाही होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसांत तापमानवाढ अशीच सुरू राहणार आहे. आधीच तापमानाचा पारा ४७ अंशांवर गेला असताना आता तापमान ४८ च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नागपूर शहरात अघोषित संचारबंदी लागू झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून नेहमी गजबजणाऱया रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे.