ETV Bharat / state

'घेऊन जा गे मारबsssssत', नागपुरात मारबत उत्सवाची तयारी पूर्ण, 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व - पिवळ्या मारबतीचे महत्त्व -

देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन प्रकारच्या मारबतींची मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास लाभला आहे. या काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेऊया 'या' स्पेशल रिपोर्टमधून...

काळी,पिवळी मारबत
author img

By

Published : Aug 30, 2019, 8:47 AM IST

Updated : Aug 30, 2019, 3:07 PM IST

नागपूर - नागपूर लाभलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा म्हणजेच मारबत उत्सव होय. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे उच्चाटन करण्यासाठी काळ्या-पिवळ्या मारबतीची मिरवणूक येत्या १ सप्टेंबरला निघणार आहे.

'घेऊन जा गे मारबsssssत', 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये काळी आणि पिवळी अशा दोन प्रकारच्या मारबतींची मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास लाभला आहे.

काळ्या मारबतीचे महत्त्व -
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाची सत्ता होती. त्यांच्या जुलुमी कारवायांमुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच अनेक मानव जातीसाठी घातक असलेल्या अनेक रुढी परंपरांचे उच्चाटन करणे. वाईट परंपरा, रोगराई, संकटांतून समाजाला मुक्त करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे. इंग्रजांना संशय येऊ नये यासाठी या काळ्या मारबतीला महाभारताचा संदर्भ दिला जातो. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतणा मावशीचे प्रतीक म्हणजे काळी मारबत समजले जाते. सर्वप्रथम अप्पाजी मराठे यांनी काळ्या मारबतीचा उत्सव साजरा केला. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३८ वर्षांपासून इतवारीस्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते.

हे वाचलं का? - नंदुरबार : पोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या, सरजा-राजाला सजवण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

पिवळ्या मारबतीचे महत्त्व -
ब्रिटिश राजवटीत जनता ब्रिटिशांच्या अत्याचाराने त्रस्त होती. त्यावेळी देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी काळ्या आणि पिवळ्या दोन्ही मारबतींची मिरवणूक एकाचवेळी काढली जाते. चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी पिवळी मारबत काढली जाते. लोकांचे रक्षण करणारी मूर्ती म्हणजेच पिवळी मारबत असते.

हे वाचलं का? - धुळ्यात बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठा सजल्या; लाखो रुपयांची उलाढाल

देशातील घडामोडींवर भाष्य करणारे बडगे -
काळ्या-पिवळ्या मारबतीसोबत बडगे देखील काढले जातात. यामध्यमातून देशातील चांगल्या-वाईट घडामोडींवर बडगे तयार केले जातात. तसेच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर टीका केली जाते. त्यामुळे यंदा तिहेरी तलाक, कलम 370 सह अनेक मुद्दे बडग्याचे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का? - मारबतच्या आशयावरील बकाल चित्रपटाचं संगीत अनावरण

मारबत उत्सवावरील 'बकाल' चित्रपट -
देशात फक्त नागपुरात मारबत उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे संपूर्ण देशाला या उत्सवाबाबत माहिती व्हावी. तसेच ही परंपरा कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने या उत्सवाची दखल घेतली आहे. त्यासाठी मारबत उत्सवावर बकाल चित्रपट येणार आहे. यामधील 'घेऊन जा गे मारबsssssत' हे गाणं नुकतचं रिलीज करण्यात आले.

Intro:संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बडग्या-मारबत महोत्सवाला सुरुवात झाली आहे...मारबत उत्सव गेल्या १३५ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो आहे....नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे...बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी शहरातून काढली जाते... देशात एकमात्र नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो . मात्र मारबत म्हणजे नेमकं काय... याच महत्व काय हे जाणून घेऊया या रिपोर्ट मधून .. Body:धावपळीच्या या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत असताना
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूराने 135 जुना प्राचीन आणि ऐतिहासिक वारश्याचे जतन केले आहे....नागपूर शहराला सावजी मटण, हिवाळी अधिवेशन,वऱ्हाडी पाहुणचार आणि गोड गोड संत्र्यांसाठी ओळखल जातं, पण नागपूरची नागपूरची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे बडग्या-मारबत प्रथा....समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते.. या मध्ये ऐतिहासिक काळी व पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात....मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत ... महाभारत काळाचा संदर्भ देखील या उत्सवाला दिला जातो, कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्रतीक काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अश्या दोन विशाल मूर्ती असतात .. इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला... गणेशोत्सवा पेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे...प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या .. त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत .. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत .. वाईट परंपरा , रोग राई ,संकट समाजातून घालवाव्या आणि चांगल्याच स्वागत करावं यासाठी हि मारबत निघत असते .. गेल्या १३५ वर्षा पासून हि मारबत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नंदी बैलाच्या पोळ्याच्या दिवशी निघते ... बडग्या मारबत ची मिरवणूक ही शहराच्या वेगवेगळ्या भागातून हि जाते ..मिरवणूकी नंतर त्यांचं विसर्जन केल्या जाते तर पिवळ्या मारबत्तीची पूजा केली जाते .. या उत्सवाला आता ऐतिहासिक असं महत्व प्राप्त झालं आहे

बाईट -- जयवंत ताकीतकर -- आयोजक पिवळी मारबत

या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे तयार केली जातात,त्यामुळे यंदा तिहेरी तलाक, कलम 370 सह अनेक मुद्दे मारबतीचे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे...बडग्या मारबत हा उत्सव बघण्याचा साठी नागपूरचं नाही तर छत्तीसगड मध्य प्रदेश आणि देशाच्या अनेक भागातील लोक येतात..

बाईट -- हृतिक केसरवाडे - आयोजक काळी मारबत

नागपूरच्या या ऐतिहासिक परंपरेचं नागपूरच्या इतिहासात अतिशय महत्वाचं स्थान असून एमटीडीसी ने सुद्धा याला ब्रान्ड बनवून जगात नागपूरची हि परंपरा पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे ... या नागपूरच्या मारबतीच्या परंपरेचं नागपूरकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते

टीप - या उत्सवाचे नागपूर सह विदर्भात फार महत्व असल्याने ही स्टोरीचा व्हॉइस ओव्हर सह विशेष पॅकेज करावा ही विनंती Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.