ETV Bharat / state

पोलीस ऐकत नसल्याने दारु विक्रेत्याला महिलांनी चोपले; गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार

पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला बडवले आहे. नरखेड तालुक्यातील आग्रा गावातील महिलांनी दारूड्याला चोप दिला. हे गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील आहे.

illegal liquor in nagpur
पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला बडवले आहे.
author img

By

Published : Jul 4, 2020, 7:39 PM IST

नागपूर - पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला बडवले आहे. नरखेड तालुक्यातील आग्रा गावातील महिलांनी दारूड्याला चोप दिला. हे गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील आहे.

पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने महिलांना कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला बडवले आहे.

आग्रा गावातील वेशीवर या अवैध दारू विक्रेत्याला महिलांनी पकडले; आणि त्याच्याकडील प्लास्टिकच्या डब्यांची पाहाणी केली. त्यात देशी दारू आढळल्याने महिला संतापल्या. यानंतर त्यांनी संबंधित दारू विक्रेत्याला अद्दल घडवण्यासाठी चपलेने मारायला सुरुवात केली.

दरम्यान, आग्रा गावात महिलांनी 29 जून रोजी बैठक घेत अवैध दारूविक्री होऊ देणार नसल्याचा निर्धार केला होता. त्याची सूचना पोलिसांना देखील देण्यात आली. मात्र, तरीही अवैध दारूवर लगाम लागला नव्हता. पोलीस काहीच करत नसल्याचे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरू केले. काल संध्याकाळी ललित खडसेला रंगेहात पकडून त्याच्याकडील दारू जप्त केली. त्याला बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.