नागपूर- सत्ता स्थापन करण्यासंदर्भात सर्व काही सुरळीत सुरू आहे. आता निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. राज्याला स्थिर सरकार द्यायची असेल तर थोडा वेळ लागणार असल्याचे ते म्हणाले. सत्ता स्थापन करणे सोपे वाटत असले तरी ती चालवणे कठीण असते, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा- नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करा - शरद पवार