ETV Bharat / state

सात महिन्यानंतर जीम पुन्हा सुरू; 'देर आऐ दुरूस्त आऐ' म्हणत जीम चालकांकडून निर्णयाचे स्वागत

मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच राज्य शासनाने जीम सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.

author img

By

Published : Oct 26, 2020, 4:17 PM IST

Gym
जीम

नागपूर - कोरोनामुळे सात महिन्यापासून बंद असलेल्या जीम पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या नागपुरातील बहुतांशी जीम सुरू झाल्या आहेत. जीममध्ये सर्व नियमांना लक्षात घेऊन व्यायाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या या निर्णयावर जीम चालकांनी 'देर आऐ दुरूस्त आऐ' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जीम सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयावर मत व्यक्त करताना जीम संचालक

जीम चालक घेत आहेत काळजी -

कोरोनामुळे बंद असलेल्या जीम सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली. अनेक महिन्यापासून बंद असलेल्या जीम आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत जीममध्ये व्यायाम सुरू झाला आहे. जीममध्ये अधिक गर्दी होऊ नये म्हणून दहा-दहा व्यक्तींचे गट पाडून त्यानुसार प्रवेश दिला आहे. त्याचबरोबर संपूर्ण जीममधे कोरोना विषयक सर्व खबरदारीही घेतली जात आहे. जीममधील प्रशिक्षक देखील प्रशिक्षण देताना सर्व काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. वेळोवेळी हात सॅनिटाईझ करणे, जीममध्ये गर्दी होऊ न देणे, दर एक तासात संपूर्ण जीम सॅनिटाईझ करणे यासारख्या बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.

देर आऐ दुरूस्त आऐ -

गेल्या सात महिन्यांपासून जीम बंद असल्याने जीम संचालकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. आता जीम सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक जीमला पुन्हा येतील का? अशी शंकाही जीम संचालकांनी व्यक्त केली. हा निर्णय शासनाने पूर्वीच घ्यायला हवा होता, परंतु 'देर आऐ दुरूस्त आऐ' अशी भावनाही जीम संचालकांनी बोलून दाखवली.

नागरिकांनी केले निर्णयाचे स्वागत -

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत सर्वजण लॉकडाऊनमुळे घरातच बसून होते. त्यानंतर लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले. मात्र, जीम सुरू करण्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागल होता. आता जीम सुरू झाल्याने या तक्रारी दूर होतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.