ETV Bharat / state

जन्मदिनी नितीन गडकरींना अनमोल गिफ्ट, सोनपावलांनी नातीचे आगमन - नागपूर नितीन गडकरी वाढदिवस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काल वाढदिवस साजरा केला. या दिवशी त्यांना अनमोल गिफ्ट मिळालं. नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

नागपूर
nagpur
author img

By

Published : May 28, 2021, 4:29 AM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा दिवशीच (27 मे) त्यांच्या घरी सोनपावलांनी एका परीचे आगमन झाले आहे. नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल (27 मे) त्यांच्या लाडक्या नातीचा गृहप्रवेश झाला आहे. नितीन गडकरी हे ज्यावेळी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी असतात, तेव्हा बच्चे कंपनीच्या गोतावळ्यात गुंतलेले आजोबा अनेक वेळा नागपूरकरांनी अनुभवले आहेत. काल तर त्यांच्या हातात वाढदिवसाची अमूल्य भेट होती.

जन्मदिनी नितीन गडकरींना अनमोल गिफ्ट, सोनपावलांनी नातीचे आगमन

मोलाचं गिफ्ट

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने देशभरातील प्रत्येक पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात हे मोलाचं गिफ्ट मिळाल्याने गडकरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे.

औक्षणावेळीही नात गडकरींकडेच

गडकरींच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. कांचन गडकरी यांनी नितीन गडकरी यांचे औक्षण केले. त्यावेळीही लाडाची नात नितीन गडकरी यांच्याकडेच होती. दिवस-रात्र व्यस्त असणारे आजोबा आज घरी असल्याने घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत यावेळी धम्माल केली. बच्चे कंपनीने आपल्या छोट्याशा हातांनी तयार केलेले वाढदिवसाचे खास ग्रेटिंग कार्ड नितीन गडकरींना दिले. त्यांनीही मोठ्या उत्सुक्तेने बच्चे कंपनीचे गिफ्ट उघडून पाहिले. हा आनंदाचा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

नागपुरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

देशातील सर्वात कार्यक्षम, नावीन्यपूर्ण योजना तयार करून त्या अमलात आणणारे मंत्री आणि जनसामान्यांचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देशभरात ओळख मिळाली आहे. कोरोना लढाईसाठीही ते मोलाची भूमिका बजावत आहेत. नितीन गडकरी यांचा वाढदिवस असल्याने नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे नितीन गडकरींचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे हा दिवस त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि नवीन नातीसोबत घालवला.

हेही वाचा - बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कमांडिंग ऑफिसर पदी वर्ध्याच्या वैशाली हिवसेची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.