ETV Bharat / state

नागपूरात 28 किलो गांजासह दोघांना अटक; झारखंडहून गांजा तस्करी - GITTIKHADAN GANJA TRANSPORT

गिट्टीखदान पोलिसांनी 28 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक कार आणि चार लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज अन्सारी वल्द नूर मोहम्मद आणि शुभम उर्फ ढग्या करलुके यांचा सामावेश आहे.

NAGPUR GITTIKHADAN GANJA
नागपूरात 28 किलो गांजा सह दोघांना अटक
author img

By

Published : Jan 5, 2021, 11:03 AM IST

नागपूर - गिट्टीखदान पोलिसांनी गांजा तस्करीची मोठी खेप पकडली आहे. पोलिसांनी 28 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एक कार आणि चार लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज अन्सारी वल्द नूर मोहम्मद आणि शुभम उर्फ ढग्या करलुके यांचा सामावेश आहे. ते दोघेही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. त्यांनी हा गांजा रांचीहून आणल्याची कबुली दिली आहे.

नागपूरात 28 किलो गांजा सह दोघांना अटक

नागपूर पोलिसांची कारवाई
नागपूर गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजासह एमडी ड्रग्स तस्करांच्या टोळीतील अनेक सदस्यांना अटक केल्यानंतर नागपूरात ड्रग्स तस्करी वाढल्याचे दिसून आले. आता गिट्टीखदान पोलिसांनी गांजा तस्करी उघडकीस आणली आहे. गिट्टीखदान पोलीसांचे पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना झारखंड पासिंग असलेली एक कार संशयास्पद रित्या फिरताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी कार थांबवून कारमध्ये असलेल्या दोघांची विचारपूस केली. तेव्हा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पोलिसांनी कारची झडती घेतल्यावर त्यात प्लास्टिक बॅगमध्ये गांजा आढळला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. नागपूर शहर हे आता गांजा आणि ड्रग्ज तस्करीचे केंद्र बनत असल्याने शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गांजा तस्करांचे रॅकेट सक्रिय
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने गांजा तस्कर नागपूर मार्गे गांजा देशाच्या इतरत्र स्थळी पाठवत आल्याचं प्रकर्षाने जाणवू लागल आहे. गेल्याकाही वर्षात प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून हे तस्कर छुप्या मार्गाने गांजा तस्करी करायचे मात्र रेल्वे पोलिसांनी या संदर्भात कठोर पावलं उचलल्याने गांजा तस्कर आता खासगी वाहनातून गांजा तस्करी करत असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! मालाडमध्ये प्रियसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.