ETV Bharat / state

Nagpur suicide News : मैत्रीणीच्या आत्महत्येपाठोपाठ युवतीची आत्महत्या - Girl Suicide

शहरात आत्महत्या केल्याच्या घटना वाढत आहेत. मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर सातत्याने तणावात असलेल्या एका तरुणीने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर ही घटना गुरूवारी घडकीस आली.

Nagpur suicide News
नागपूर आत्महत्या
author img

By

Published : Jun 16, 2023, 3:59 PM IST

नागपूर : रूममेट मैत्रिणीने आत्महत्या केल्यामुळे व्यथित झालेल्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मैत्रिणीच्या आत्महत्येनंतर प्रियंका सराटे ही सातत्याने तणावात होती. त्यातूनच तिने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली.

प्रियंका होती तणावात : प्रियंका एका खासगी दुकानात काम करायची. तिच्या मैत्रिणीने तीन महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रियंका अस्वस्थ व तणावात होती. या घटनेचा प्रियंकाच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. ती नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील संताजी नगर येथे तिच्या कुटुंबासोबत राहत होती. सगळीकडे शोधा-शोध घेऊन ती कुठे न आढळल्याने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेतला असता पाण्याच्या टाकीत प्रियांकाचे शव आढळले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

प्रियंका ढोलताश्या पथकाची सक्रिय सदस्य : प्रियंका ही सामाजिक कार्यात देखील सक्रिय होती. ती शिवगर्जना या ढोल ताश्या पथकाची महत्त्वाची सदस्य देखील होती. प्रियंका सराटेने देशांतर्गत झालेली अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती.

अशीच आणखी एक घटना : क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी करताना कर्जबाजारी झालेल्या 22 वर्षीय तरुण मुलाने आत्महत्या केली. तरुण मुलाच्या मृत्यूने आईला जबर धक्का बसला. त्यामुळे आईचा ही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुर शहरात घडली आहे. खितेन वाधवानी असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव होते. तर दिव्या वाधवानी असे मृत आईचे नाव होते. तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खितेनला क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजीचे व्यसन होते. त्यामुळे त्याने क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजीत खूप पैसे गमावले होते. क्रिकेट सामन्यात लावलेल्या सट्ट्यावर तो पैसे हरल्याने आणि आईने रागावल्यामुळे खितेन नैराश्यात गेला होता.

हेही वाचा -

  1. Mumbai Suicide News लिंग परिवर्तन केलेल्या तरुणीने राहत्या घरात केली आत्महत्या हे होते कारण
  2. Kota Student Suicide कोटामध्ये नंदूरबारच्या विद्यार्थ्याची आत्महत्या जेईई परीक्षेची करत होता तयारी
  3. Neet Result नीट परिक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या दुर्गम भागातील सोळा विद्यार्थ्यांनी मिळविले यश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.