नागपूर - १६ नोव्हेंबरपासून शहरातील घराघरातून कचरा संकलनाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. यासाठी 'एजी एनवायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'बीव्हीजी इंडिया' या २ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या या गाड्या नंबर प्लेट विनाच रस्त्यावर धावत आहेत. यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपुरात कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या या गाड्यांवर नंबर प्लेट नाही. त्यामुळे मनपाच्या या वाहनांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी 'कनक रिसोर्से कंपनी'कडून कचरा संकलनासाठी ३०० वाहने वापरण्यात येत होती. मात्र, १२०० मेट्रीक टन कचऱ्याचे संकलन करण्याकरता गाड्या अपुऱ्या असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या मनपाकडे कचरा संकलनाच्या ४७२ गाड्या आहेत. मात्र, ही वाहने नंबर प्लेट विनाच फिरत असलाचे निदर्शनास येत आहे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या कामगारांना मास्क आणि हँड ग्लोव्हज देखील नाहीत.
हेही वाचा - नागपुरी संत्र्याची आवक घटली, भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत
विना नंबर प्लेटच्या गाड्या वर्कशॉपमधून येत नाहीत. तसेच कुठलीही गाडी नंबर प्लेट तपासूनच सोडली जाते, अशी माहिती मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यामुले नंबर प्लेट नसणाऱ्या या गाड्यांची माहिती आयुक्तांना नसल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - नागपूरच्या रेस्टॉरेंटमध्ये ५ लाखांचा वेटर रोबोट