ETV Bharat / state

Nagpur Crime : दहावीत शिकण्याऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन्ही आरोपींना अटक - अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरच्या सावनेर तालुक्यात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळा सुटल्यावर पीडित मुलगी घरी जाण्यासाठी पायी निघाली होती. ओळखीतील दोन तरुणांनी तिला कारने घरी सोडून देण्याची बतावणी केली. आरोपी पीडित विद्यार्थीनीच्या ओळखीचे होते.

Nagpur Crime
सामूहिक बलात्कार
author img

By

Published : Jan 25, 2023, 10:05 AM IST

Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST

नागपूर : अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून आरोपींनी घरी सोडून देण्याऐवजी निर्मनुष्य स्थळी नेले. तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. अखिल उर्फ अक्की महादेव भोंगे आणि पवन विठ्ठल भासकवरे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडितेच्या मैत्रिणीने आरोपींसोबत ओळख करून दिली होती. येता जाता भेट होत असल्याने पीडितेची आरोपींसोबत मैत्री झाली होती. मंगळवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित तरुणी पायी चालत घरी जात असताना, आरोपी अखिल महादेव भोंगे आणि पवन भासकवरे हे दोघेही कार घेऊन आले. तुझ्या घराच्या दिशेनेच जात असल्याची बतावणी करून दोघांनी तिला कारमध्ये बसवले.

गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक : पीडित अल्पवयीन मुलीला सोडून आरोपींनी पळ काढला. पीडितेने कसेबसे घर गाठले. घर गाठताच तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तत्काळ गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भादंवि ३६३, ३७६ (२) (जे), ३७६ (५), ३२३, ५०६, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लिव्ह इन पार्टनरकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार : नागपूर शहरातील हुडकेश्वरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ३२ वर्षीय महिलेच्या लिव्ह इन पार्टनरकडून हा गुन्हा करण्यात आला. अमोल घरडे असे नराधमाचे नाव आहे. महिला आणि मुलगी वेगळे राहत होते. दरम्यान अमोलसोबत तिची ओळख झाली. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. ती महिला मुलगी आणि प्रियकर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. यादरम्यान आरोपीची १३ वर्षांच्या मुलीवर अमोलची नजर पडली. तिची आई झोपल्यानंतर तो तिच्याशी अश्लील चाळे करायला लागला. प्रेयसी घरी नसल्यावर तो तिच्यावर बळजबरी करत होता. पीडित मुलीने सर्व प्रकार मैत्रिणीच्या आईला सांगितला. तिने मुलीच्या आईशी चर्चा केली. त्यानंतर आईने पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली. अशा घटनांवरून नागपूरमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा : Aurangabad Crime : विवाहितेची स्कार्फने गळफास घेत आत्महत्या, चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजाने घटना उघड

Last Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.