नागपूर- कोरोनामुळे सर्वत्र गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. शहरातही काल खूप शांततेत गणरायाचे आगमन झाले होते. त्याच शांततेत आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी महानगरपालिका व प्रशानाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करत या दीड दिवसाच्या गणपतीचे शहरातील फुटाळा तलाव लगत असलेल्या कृत्रिम जलकुंभामध्ये विसर्जन करण्यात आले.
एरवी दीड दिवसाच्या घरगुती गणपतीला मोठ्या थाटात निरोप दिला जातो. परंतु, यंदा विसर्जना वेळी मोजक्याच नागरिकांची उपस्थिती होती व अगदी शातेत हा गणेश विसर्जन पार पडला. यावेळी नियमांचे उल्लंघन होवू नये म्हणून नागरिकांनी विशेष खबरदारी घेतल्याचे देखील दिसून आले. फुटाळा तलाव येथे विसर्जनादरम्यान फक्त घरगुती गणेश मूर्त्याच दिसून आल्यात. यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देताना नागरिकांमध्ये दरवर्षी प्रमाणे असणारा उत्साह दिसून आला नाही. मात्र, नागपूरकांरांनी संपूर्ण श्रद्धेसह बाप्पाला निरोप दिला.
हेही वाचा- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी बाप्पा विराजमान