नागपूर : Ganesh Chaturthi २०२३ : आजपासून गणेशोत्सवाच्या उत्सवाला (Ganeshotsav २०२३) सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण (Tekdi Ganpati History) झाले आहे. नागपूरचं नाही तर विदर्भ, मध्यप्रदेश व शेजारच्या राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिरात (Tekdi Ganesh Mandir In Nagpur) सकाळच्या आरती पासून उत्सवाला (Tekdi Ganesh Aarti) सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या पहिल्या आरतीसाठी मोठया संख्येने भक्तगण उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी टेकडी गणेश मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे.
सचिन तेंडुलकरची श्रद्धा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच नागपूरच्या टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतो. सचिनची खूप श्रद्धा या गणपतीवर आहे. ज्यावेळी क्रिकेटचा सामना नागपुरात असायचा, त्यावेळी सचिन तेंडुलकर हा टेकडी गणपतीचे दर्शन घेऊनच मैदानात उतरायचा. सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी टेकडी गणपतीच्या दर्शनसाठी नागपुरात येत असतात.
गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी : कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी वर्षभरचं असते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे. आज तर गणेश चतुर्थी असल्याने टाळ मृदुगांच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे.
टेकडी मंदिराचा इतिहास : आपल्या देशात इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती, असा इतिहास आहे. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे.
पिंपळाच्या झाडाखाली बाप्पा स्थानापन्न : गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात विनायकाचं मंदिर अगदी छोटासे होते. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड असून शेंदराच्या लेपामुळे आता स्पष्टपणे दिसत नाही.
हेही वाचा -