ETV Bharat / state

पाकिस्तानचा भ्याड हल्ला: वीरमरण आलेल्या जवान भूषण यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यस्कार

ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे भूषण सतई यांना वीरमरण आले आहे.

हुतात्मा भूषण
हुतात्मा भूषण
author img

By

Published : Nov 14, 2020, 4:00 PM IST

नागपूर - पाकिस्तानी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या भूषण सतई यांच्या पार्थिवावर उद्या जिल्ह्यातील काटोल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भूषण हा काटोल येथील रहिवासी असून त्याचे संपूर्ण शिक्षण त्याच ठिकाणी झाले आहे. भूषण यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूरला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर काटोल येथे अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती पुढे आली आहे.

ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे भूषण सतई यांना वीरमरण आले आहे. ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण काटोलसह नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना भूषण यांना वीरमरण आले आहे. ते २८ वर्षांचे होते.

भूषण सवई हे वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यात देशसेवेसाठी रुजू झाले होते. महाविद्यालयात असल्यापासूनच भूषण यांनी सैन्यात रुजू होण्यासाठी तयारी केली होती. शुक्रवारी दुपारी गुरेज सेक्टर येथे भूषण कार्यरत असताना पाकिस्तानी लष्कराने केरेन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रतिउत्तर दिले. यावेळी भूषण यांना वीरमरण आले आहे.

प्रशासनाकडून तयारीला सुरवात

हुतात्मा भूषण यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने नागपूरला आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मानवंदना दिल्यानंतर ते पार्थिव काटोल येथे रवाना होईल अशी माहिती पुढे आली आहे. काटोल येथील मैदानावर उद्या सकाळी भूषण यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासननाकडून तयारी करण्यात येत आहे. काटोल येथील मैदान स्वच्छ केले जात आहे.

पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार -

उरी सेक्टरमध्ये तीन नागरिकही पाकिस्तानच्या गोळीबारात ठार झाले आहेत. तर काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीचे विभागीय अधिकारी रियाज अहमद मलिक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पाक लष्करातील स्पेशल सर्व्हीस ग्रुपच्या (SPG) जवानांचाही सहभाग आहे. तर काही पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाले आहेत.

कोल्हापूरच्या जवानालाही वीरमरण

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवानालाही वीरमरण आले आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.