ETV Bharat / state

वाहतूक पोलीस आणि ऑटो चालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ वायरल - driver

शहरातील गणेश पेठ बस डेपो जवळ २ ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मारहाण केलेल्या ऑटो चालकांना पोलिसांनी अटक केली.

author img

By

Published : Feb 13, 2019, 6:24 PM IST

नागपूर - शहरातील गणेश पेठ बस डेपो जवळ २ ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मारहाण केलेल्या ऑटो चालकांना पोलिसांनी अटक केली. ही घटना गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मागील २ दिवसात वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या २ घटना घडल्या आहेत.

undefined

सोनू कांबळे आणि मयूर राजूरकर असे अटक करण्यात आलेल्या ऑटो चालकांची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांवर हल्ला करणारे ऑटो चालक रस्त्याच्या मध्येच ऑटो उभा करून प्रवाशी बसवायचे ज्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. या संदर्भात आज वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईमुळे दुखावलेल्या ऑटो चालकांनी थेट पोलिसांनाच मारहाण केली.

उपस्थित नागरिकांनी पोलीस आणि ऑटो चालकांमधील फ्री-स्टाईल मारामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो वायरल केला. या संदर्भात गणेशपेठ पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्या ऑटो चालकांना अटक करण्यात आली. हेल्मेट न घातल्याने वाहन चालकाला जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसांवर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली.

Intro:नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपेठ बस डेपो जवळ दोन ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली आहे....वाहतूक पोलिसांनी मारहाण होण्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे....वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी दोन ऑटो चालकांना अटक केली असून मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाला आहे

Body:हेल्मेट न घातल्याने वाहन चालकाला जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसांवर एक इसमाने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा अश्याच प्रकारची घटना घडली आहे....आज नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक पोलिसांनी ऑटो चालकांवर कारवाई केली ,त्यावेळी कारवाईमुळे दुखावलेल्या ऑटो चालकांनी चक्क वाहतूक पोलिसांना अमानुष मारहाण केली आहे....पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार वाहतूक पोलिसांवर हल्ला करणारे ऑटो चालक रस्त्याच्या मध्येच ऑटो उभा करून प्रवाशी बसवायचे ज्या मुळे वाहतूक कोंडी व्हायची....या संदर्भात आज वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाईचा बडगा उभारला असता कारवाईमुळे दुखावलेल्या ऑटो चालकांनी थेट पोलिसांवरच हात घातला....बघता बघता ऑटो चालकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली....त्या ठिकणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलीस आणि ऑटो चालकांमधील फ्री-स्टाईल चा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो वायरल केला....या संदर्भात गणेशपेठ पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली....पोलिसांनी आरोपी ऑटो चालक सोनू कांबळे आणि मयूर राजूरकर यांना अटक केली आहे

महत्वाची सूचना

*व्हिडीओ मध्ये शिवीगाळ असल्याने त्या ठिकाणी बीप किव्हा व्हॉइस कट करावा*

वरील बातमीचे व्हिडीओ आपल्या "FTP अड्रेस वर ( R-MH-NAGPUR-13-FEB-FREE-STYLE-TRAFFIC-POLICE-AND-AUTO-DRIVER-DHANANJAY) सेंड करण्यात आलेले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.