नागपूर - अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडली. त्यामुळे दहशतवाद्यांनी या यात्रेवर कट रचला आहे. तसेच या स्नायपर रायफलने दीड ते २ किलोमीटरवरून हल्ला करता येऊ शकतो. त्यामुळे दहशतवादी डोंगराच्या वरच्या भागावरून लपून हल्ला करू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे माजी लष्कर अधिकारी डॉ. अभय पटवर्धन म्हणाले.
दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यामुळे यात्रेकरुच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या आशयाचे पत्रक जम्मू-काश्मीर सरकारने जारी केले आहे. तर यात्रेकरूना लवकरात लवकर परतण्यास सांगितले आहे.
अमरनाथ यात्रेला देशभरातून मोठ्या प्रमाणात हिंदू भाविक-भक्त जात असतात. त्यामुळे दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ला करून घातपात करणे, दंगली घडविणे हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सतर्क राहण्यासोबतच स्वयंसुरक्षा देखील महत्वाची असल्याचे डॉ. पटवर्धन म्हणाले.