नागपूर- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात 'खासदार औद्योगिक महोत्सवाचे' आयोजन केले जाणार आहे. देशातील हा पहिलाच महोत्सव असेल. दिनांक 14 ते 16 मार्च दरम्यान हा महोत्सव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पार पडणार आहे.
हेही वाचा- 'काश्मीरप्रश्नी तुर्कस्तानने ढवळाढवळ करू नये'
भारत सरकारच्या सुक्ष्म लघू आणि मध्यम लघू उद्योगांना उभारी मिळावी, नवीन रोजगार निर्माण व्हावेत यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. 'व्हिलेज इंडस्ट्रीज'ची वार्षिक उलाढाल 1 लाख कोटी असून पुढील पाच वर्षात ही उलाढाल 5 लाख कोटी रुपये करण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला आहे. या महोत्सवात 100 सुक्ष्म आणि लघू उद्योगांचे स्टॅाल असणार आहेत. तसेच 50 आंतरराष्ट्रीय कंपनींचेही स्टॉल असणार आहेत.
या महोत्सवात बायर-सेलर मिट, एक्सपर्ट प्रमोशन, इम्पोर्ट इडिझाईनेशन, लॉजिसटीक, सर्व्हिस सेक्टर, स्टार्टअप ,ऑटोमोबाईल सेक्टर, ऍग्रो आणि फूड प्रोसेसिंग, एनर्जी सेक्टर, डिफेन्स प्रोक्यूरमेंट, क्रेडिट फॅसिलेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर प्लास्टिक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग सेक्टर या विषयांवर 3 दिवस चर्चा सत्र होणार आहे.