नागपूर - देशात सत्तेसाठी स्पर्धा राहणार आहे. पण त्यालाही एक मर्यादा असते. जेवढी आपसांत टीका करायची तेवढी करावी पण आपसात भेद होईल असे वागू नये, असा वडिलकीची सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. देशाची अखंडता कायम राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही, असा घणाघातही कुणाचेही नाव न घेता भागवत यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्ष वर्ग प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला. या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, कोल्हापूरच्या सिद्धगिरी संस्थान मठ कनेरीचे काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी 25 दिवस प्रशिक्षण घेतलेल्या 682 स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
-
#WATCH पूरी दुनिया में इस्लाम का आक्रमण हुआ, स्पेन से मंगोलिया तक छा गया। धीरे-धीरे वहां के लोग जागे, उन्होंने आक्रमणकारियों को परस्त किया। तो अपने कार्य क्षेत्र में इस्लाम सिकुड़ गया। सबने सब बदल दिया। अब विदेशी तो यहां से चले गए लेकिन इस्लाम की पूजा कहां सुरक्षित चलती है, यहीं… pic.twitter.com/uBdULvYKY0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH पूरी दुनिया में इस्लाम का आक्रमण हुआ, स्पेन से मंगोलिया तक छा गया। धीरे-धीरे वहां के लोग जागे, उन्होंने आक्रमणकारियों को परस्त किया। तो अपने कार्य क्षेत्र में इस्लाम सिकुड़ गया। सबने सब बदल दिया। अब विदेशी तो यहां से चले गए लेकिन इस्लाम की पूजा कहां सुरक्षित चलती है, यहीं… pic.twitter.com/uBdULvYKY0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023#WATCH पूरी दुनिया में इस्लाम का आक्रमण हुआ, स्पेन से मंगोलिया तक छा गया। धीरे-धीरे वहां के लोग जागे, उन्होंने आक्रमणकारियों को परस्त किया। तो अपने कार्य क्षेत्र में इस्लाम सिकुड़ गया। सबने सब बदल दिया। अब विदेशी तो यहां से चले गए लेकिन इस्लाम की पूजा कहां सुरक्षित चलती है, यहीं… pic.twitter.com/uBdULvYKY0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
...तर देशाचे कल्याण होणार नाही - मधल्या काळात समाजामध्ये जात पात आली. बाहेरून आक्रमणे झाली. ते आले तसेच बाहेरचे निघूनही गेले. आता बाहेरचे कोणीही देशात नाहीत. जे आहेत ते आपलेच आहेत. त्यांचे प्रबोधन करणे आपले काम आहे, असे भागवत म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आम्ही साजरी केली. तसेच जी 20 ची अध्यक्षताही आम्हाला मिळाली. आता तर देशाला नवी संसद मिळाली आहे. जी जागृती पाहिजे होती त्याचे प्रयत्न होत आहेत. भारताची कीर्ती होत आहे. काही गोष्टी ठीक झाल्या. मात्र काही ठीक झाल्या नाही तर देशाचे कल्याण होणार नाही.
सत्ताधाऱ्यांना इशारा - देशातील सध्य परिस्थितीवरही भागवत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देशात सध्या अनेक कलह सुरू आहेत. भाषा, पंथ संप्रदाय, मिळणारे लाभ यावरुन समाजात विभाजन होताना दिसत आहे. स्वतःच आपली हिंसा आपण करु लागलो आहोत. आपण एकसंघ असल्याचे विसरू लागलो आहोत, याला हवा देणारेही लोकही आहेत, असा एकप्रकारे घरचा आहेरच भागवत यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नाव न घेता थेटपणे दिला आहे.
आपले पुर्वज एकच - सत्यस्थितीला ओळखून, चुकीलाही सुधारणार असे सर्वांचे काम आहे. पण भेद आणि अहंकारामुळे भूतकाळातील बॅगेज आपण बाकी ठेवले आहे. भारतातच आपली मूळ ओळख कायम आहे. जगात इस्लामचे आक्रमण झाले. इस्लामचे कार्यक्षेत्र आकुंचित होत आहे. त्याचवेळी इस्लामची सुरक्षा कुठे असेल तर इथेच आहे. मात्र त्यावरुन आपसात भेद नको आहे. सगळ्यांना समजून घेणे आवश्यक आहे. आपली पूजा वेगवेगळी असली तरी आपले पूर्वज एकच आहेत, हे आपण का समजत नाही, असा सवालही भागवत यांनी केला आहे.
-
#WATCH जैसे गर्मी में वर्षा कि बौछारे सुखद लगती है वैसे ही स्वतंत्रता के 75 वर्ष बाद इस प्रकार कि सुखद भावनाओं का अनुभव हम जैसे कर रहे है, वैसे चिंतित करने वाला दृश्य भी हमें परिस्थिति मे मिल रहा है। इसी समय देश में कितने जगह कितने प्रकार के कलह मचे है, भाषा, पंथ, संप्रदायों,… pic.twitter.com/3mbD7hvAtk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH जैसे गर्मी में वर्षा कि बौछारे सुखद लगती है वैसे ही स्वतंत्रता के 75 वर्ष बाद इस प्रकार कि सुखद भावनाओं का अनुभव हम जैसे कर रहे है, वैसे चिंतित करने वाला दृश्य भी हमें परिस्थिति मे मिल रहा है। इसी समय देश में कितने जगह कितने प्रकार के कलह मचे है, भाषा, पंथ, संप्रदायों,… pic.twitter.com/3mbD7hvAtk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023#WATCH जैसे गर्मी में वर्षा कि बौछारे सुखद लगती है वैसे ही स्वतंत्रता के 75 वर्ष बाद इस प्रकार कि सुखद भावनाओं का अनुभव हम जैसे कर रहे है, वैसे चिंतित करने वाला दृश्य भी हमें परिस्थिति मे मिल रहा है। इसी समय देश में कितने जगह कितने प्रकार के कलह मचे है, भाषा, पंथ, संप्रदायों,… pic.twitter.com/3mbD7hvAtk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
मिळून मिसळून राहू - सर्वांचा स्वीकार करणारी आपली संस्कृती आहे, जातपातीमध्ये भेद अलिकडे झाला आहे. आपल्या देशात सध्या हे वाढले आहे. मात्र पूर्वजांची चूक आपल्याला मान्य करावी लागेल. आम्ही विभाजित झाल्याने भारताचा ह्रास झाला. मात्र ज्यांनी राज्य केले त्यांचे आता नामोनिशाण नाही. आपण एकमेकांत मिळून-मिसळून राहू शकतो हे आपण समजले पाहिजे. आपण इतके वेगळे आहोत पण एकत्र आहोत. स्वातंत्र्याची इतकी वर्षे उलटूनही लोकशाहीवादी आपला देश भविष्याच्या दिशेने चालले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थान - उद्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्यानंतर संभाजी महाराजांनी बलिदान दिले. प्रेरणा, संस्कार शिवाजी महाराजांनी दिले. गोवध थांबविले, नेव्ही तयार केली, सर्वांना जोडले, काशीचे मंदिर औरंगजेबाने तोडल्यावर त्याला पत्र लिहिले. स्वराज्याची घडी त्यांनी बसवली. ते आमचे प्रेरणास्थान आहेत, असे भागवत म्हणाले.