ETV Bharat / state

नागपूर: टाकाऊ प्लास्टिक पासून बनवल्या विटा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - buloding

टाकाऊ प्लास्टिकपासून नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी विटा तयार केल्या आहेत. या विटा १० टनापर्यंतचा दाब सहन करू शकतात.

टाकाऊ प्लास्टिक पासून बनवल्या विटा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
author img

By

Published : May 31, 2019, 5:04 PM IST

नागपूर- टाकाऊ प्लास्टिक ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, याच टाकाऊ प्लास्टिकपासून नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी विटा तयार केल्या आहेत. या प्रयोगामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याबरोबरच रोजगार निर्मती देखील होऊ शकते.

उपक्रमाविषयी माहिती देताना विद्यार्थी आणि प्राध्यापक

देशात दररोज १५ हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. त्यापैकी ११ हजार टन प्लास्टिकचा पूर्णवापर होतो आणि ४ हजार टन प्लास्टिक तसेच राहते. प्लास्टिक अविघटनशील असल्यान प्रदूषणात वाढ होत आहे. प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिकचा सर्रास वापर होतो आणि कचऱ्यातील प्लास्टिक जनावरांचा पोटात जाते. त्यामुळे कित्येक जनावरे दगावतात. या समस्यांवर उपाय म्हणून अंजुमन महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या विटा बनविल्या आहेत.

या विटा १० टनापर्यंतचा दाब सहन करू शकतात. ४ हजार टन प्लास्टिकवर प्रक्रिया केल्यास सुमारे २ हजार कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. १३ बाय ५ इंचाचे ब्लॉक बनविण्यासाठी २ किलो कचरा आवश्यक असतो. या प्लास्टिक कचऱ्याला हायड्रोलीक मशीनमध्ये १५० अंशावर मोल्डिंग केले जाते. त्यात वाळू आणि रसायन टाकून विटा बनविल्या जातात, अशी माहिती विभाग प्रमुखांनी दिली आहे.

Intro:टाकाऊ प्लास्टिक ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे मात्र याच टाकाऊ प्लास्टिक पासून नागपूर च्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनियरिंग च्या विद्यार्थ्यांनि विटा तयार केल्या आहेत. देशात दररोज १५ हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो त्या पैकी 11 हजार टन प्लास्टिक चा पूर्णवापर होतो आणि 4 हजार टन प्लास्टिक तसाच राहतो. प्लास्टिक अविघटनशील असल्यान प्रदूषनात वाढ होते आहे. प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक चा सर्रास वापर होतो आणि कचऱ्यातील प्लास्टिक मुक्या जनावरांचा पोटात जातेय त्या मुळे कित्येक जनावर दगावतात. या समस्यांन वर उपाय म्हणून अंजुमन कॉलेज च्या सिव्हिल इंजिनियरिंग च्या विद्यार्थ्यांनि प्लास्टिक च्या विटा बनविल्या आहेत

Body:या विटा १० टनापर्यंतचा दाब सहन करू शकतात . ४ हजार टन प्लास्टिक वर प्रक्रिया केल्यास सुमारे २ हजार कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो १३ बाय ५ इंचाचे ब्लॉक बनविण्यासाठी २ किलो कचरा आवश्यक असतो या प्लस्टिक कचऱ्याला हायड्रोलीक मशीन मध्ये १५० अंशावर मोल्डिंग केलं जातं त्यात वाळू आणि रसायन टाकून वीटा बनविले जातात अशी माहिती विभाग प्रमुखांनि दिलीय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.