नागपूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी दीक्षाभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केले. मुंबईतील चैत्यभूमीवरिल अभिवादन कार्यक्रम पार पाडून ते नागपूरात आले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत वंजारी हेदेखील उपस्थित होते. शिवाय या अभिवादनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिवस अर्थात महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने देशभरासह राज्यात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्या जात आहे. नागपूरातही आज सकाळपासूनच दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी अनुयायी येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत यांनीही दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस माल्यार्पण करत अभिवादन केले. तसेच बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचेही दर्शन घेतले. शिवाय भगवान गौतम बुद्धाच्या स्तूपालाही पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली. नितीन राऊत यांनी चैत्यभूमीवरील कार्यक्रम आटोपून उशीरा दीक्षाभूमीवर दाखल होत अभिवादन केले.
हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन विशेष : नव्या पिढीनं शिकून मोठं व्हावं - कडूबाई खरात यांचं आवाहन
यावेळी त्यांच्यासोबत पदवीधर निवडणूकीत निवडून आलेले नवनिर्वाचीत आमदार अभिजीत वंजारी हे देखील उपस्थित होते. शिवाय जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त व सर्व वरिष्ठ अधिकारी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.